पुण्यात हाय प्रोफाईल सेक्स रॅकेटचा पर्दाफाश

पुणे – पुण्यातील गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभाग आणि विमानतळ पोलिसांनी विमाननगर येथील स्पामध्ये छापा टाकून हाय प्रोफाईल सेक्स रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. विमाननगर परिसरातील पेशवा कॉम्पलेक्स मधील टॅन्सी वेलनेस स्पामध्ये हाय प्रोफाईल सेक्स रॅकेट सुरु असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी तेथे छापा टाकला. यावेळी पोलिसांनी थायलंडच्या ३ महिलांची सुटका केली असून, स्पा चा व्यवस्थापक रंजनकुमार पासवान याला अटक केली आहे. तर स्पा चा मालक गौतम घाडगे याच्याविरोधात विमानतळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.