दोन वर्षांत कांद्याला उच्चांकी भाव

नगर – कांद्याला आजच्या लिलावात दोन वर्षातील उच्चांकी भाव मिळाला असून 4 हजार 700 रूपये क्‍विंटल असा दर निघाला आहे.आणखी काही दिवस कांद्याची भाववाढ राहण्याची शक्‍यता आहे.

नगर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आज शंभर ते दीडशे ट्रक कांद्याची आवक झाली,अशी माहिती येथील प्रमुख आडते अनिल विधाते यांनी दिली. कांद्याची आवक आज मोठ्या प्रमाणात आवक होऊन कांद्याला उच्चांकी भाव मिळाला आहे.एक नंबर कांद्याला 4 हजार 500 ते 4 हजार 700 रूपये क्‍विंटलपर्यंत बाजार निघाला आहे.मागील काही दिवसांपूर्वी 1 हजार 200 रूपये क्‍विंटल कांद्याला बाजार होता.

सोमवारी झालेल्या लिलावात तीन हजार ते साडेतीन हजार रूपये क्‍विंटल दर होता. त्यात आज मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे.दोन वर्षापूर्वी कांद्याला पाच हजार रूपये भाव मिळाला होता.आज तब्बल 4 हजार 700 रूपये पर्यंत भाव असून हा दोन वर्षातील उच्चांकी भाव आहे. दरम्यान,नवीन नाशिक कांदा बाजारात येण्यासाठी अजून महिना ते दोन महिने लागणार आहेत.आंध्र प्रदेशमध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याने कांद्याचे नुकसान झाले आहे.त्यामुळे आंध्र प्रदेशातील कांदा बाजारात येण्यास वेळ लागणार आहे.या पार्श्‍वभूमीवर कांद्याला अजून काही दिवस तेजी राहण्याची शक्‍यता आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.