Mohit Suri : “तो एकदम छपरी आहे…” सैयाराचा दिग्दर्शक मोहित सुरी अहान पांडेविषयी असं का म्हणाला? सांगितली दुसरी बाजू

Mohit Suri : गेल्या दोन आठवड्यांपूर्वी रिलीज झालेल्या सैयारा या चित्रपटाची क्रेझ अजूनही कायम आहे. बॅाक्स अॅाफिसवर या चित्रपटाने बक्कळ कमाई केली आहे. चित्रपटाची यशस्वी घोडदोड बॅाक्स अॅाफिसवर कायम असून, चित्रपटाचे दिग्दर्शक मोहित सुरी यांनी चित्रपटातील मुख्य अभिनेता अहान पांडेबद्दल एक विधान केले आहे. सध्या त्यांनी केलेल्या विधानाची जोरदार चर्चा सोशल मीडियावर सुरू आहे.
या चित्रपटातून स्टारकिड असलेल्या अहान पांडे याने बॅालिवूडमध्ये या पदार्पण केले. पदार्पणाच्या पहिल्याच चित्रपटाने एक नवा इतिहास रचला आहे. सर्वत्र सैयारा चित्रपटाची जोरदार चर्चा होत आहे. या चित्रपटाने अहानला रातोरात स्टार केले आहे. पण, सैयारा चित्रपट ज्यांनी दिग्दर्शित केला ते या चित्रपटाचे दिग्दर्शक मोहित सुरी यांनी अहानला छपरी म्हटलं आहे. नेमकं ते असं का म्हणाले?
नेमकं काय म्हणाले मोहित सुरी?
मला आठवतंय शूटिंगचा ३०वा दिवस होता. तोपर्यंत ५० टक्के शूटिंग पूर्ण झालं होतं. अहान क्रिएटिव्ह प्रोड्युसरला म्हणाला की मी ऑडिशनमध्ये असं काय केलं होतं? असं तर कोणतंच ऑडिशन मी दिलं नव्हतं. मला तर सांगितलं गेलं होतं की या भूमिकेसाठी तू एकदम परफेक्ट आहेस, अशी अहान बद्दलची आठवण मोहित सुरी यांनी सांगितली.
त्यानंतर त्यांनी पुढे बोलताना सांगितलं की, अहान पडद्यावर दिसतो तसा तो अजिबात नाहीये. त्याची दुसरी बाजूही आहे. तो एक उत्तम डान्सर आहे. त्याने सगळे व्हिडीओज डिलीट केले आहेत. हा मुलगा टिकटॅाकर आहे. एकदम छपरी आहे, असं विधान मोहित सुरींनी केले आहे.
सैयारा या चित्रपटाला प्रेक्षकांच्या तुफान प्रतिसाद मिळताना दिसत आहे. रिलीज झाल्यापासून अवघ्या १३ दिवसांमधये या चित्रपटाने तब्बल २७३ कोटींची गल्ला गोळा केला आहे. या वर्षांतील अनेक मोठ्या चित्रपटांचे रेकॅार्ड सैयाराने मोडले आहेत. या चित्रपटातून अभिनेता अहान पांडे यांनी बॅालिवूडमध्ये नशिब आजमावलं आहे. त्याच यश चित्रपटाला मिळणाऱ्या प्रेक्षकांच्या प्रतिसादातून दिसत आहे. त्याने साकारलेल्या भूमिकेचं प्रेक्षक कौतुक करत आहेत. तर अहानसोबत अनीत पड्डा हिला देखील प्रेक्षकांच्या पसंतीची पोचपावती मिळाली आहे.





