लोकसभेसाठी हेमा मालिनी यांचा अनोखा प्रचार

नवी दिल्ली – लोकसभा निवडणुकीला अवघे काहीच दिवस शिल्लक राहिले आहेत. त्यामुळे सर्व पक्षातील नेत्यांनी प्रचारासाठी कंबर कसली आहे. प्रत्येक उमेदवार आपल्या वेगवेगळ्या उपायांनी मतदाराला आकर्षित करण्याचा प्रयत्न करत आहेत. अशातच बॉलीवूड ड्रिमगर्ल अर्थात अभिनेत्री हेमा मालिनी यांनी देखील मतदाराला आकर्षित करण्यासाठी आता चक्क ट्रॅक्टर चालवला आहे.

हेमा मालिनी यांना भाजपने मथुरा मतदारसंघातून लोकसभेची उमेदवारी जाहीर केली आहे. यापूर्वी हेमा मालिनी यांनी प्रचाराची सुरुवात मथुरेतील गोवर्धन परिसरातील एका शेतातून केली होती. यावेळी हेमा मालिनी यांनी शेतातील गहू कापण्यास शेतकऱ्यांची मदत केली होती. त्यावेळी कापलेल्या गव्हाच्या पेंढ्याही हेमा मालिनी यांनी स्वतः उचलून बाजूला ठेवल्या होत्या. त्यानंतर आज पुन्हा हेमा मालिनी ट्रॅक्टर चालवताना दिसत असल्यामुळे हेमा मालिनी यांच्या या अनोख्या प्रचाराची सध्या सर्वत्र चर्चा सुरु आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here