पुणे – करोना विषाणूच्या आजाराबद्दलची माहिती व रुग्णांची वाढती संख्या पाहून एक प्रकारची भिती नागरिकांच्या मनामध्ये निर्माण झालेली आहे. यामुळे विविध प्रकारच्या मानसिक समस्या उद्भवत आहेत. या समस्यांचे निराकरण करणे नितांत गरजेचे आहे.
या उद्देशाने महाराष्ट्र मानसिक आरोग्य संस्था, पुणे व मनोविकृतीशास्त्र विभाग, बै. जी. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने “मनसंवाद’ नावाने दूरध्वनी हेल्पलाईनची सेवा सोमवार (दि. 31 मार्च) पासून सुरु करण्यात आली आहे. ही सेवा 24 तास 7 दिवसांकरीता उपलब्ध करण्यात आलेली असून त्यासाठीचा हेल्पलाईन क्रमांक 020-26127331 असल्याचे प्राध्यापक डॉ. अजय चंदनवाले यांनी सांगितले.