पिंपरी | ईवा असोसिएशनतर्फे गरजू विद्यार्थ्यांना मदतीचा हात

पिंपरी, (प्रतिनिधी) – ईवा एंपावर्ड वुमन्स असोसिएशनतर्फे बोधिसत्व प्रतिष्ठानद्वारा संचालित राजर्षी शाहू महाराज विद्यालयातील २० गरजू विद्यार्थ्यांच्या शुल्कासाठी संस्थेला आर्थिक मदत करण्यात आली.
ईवाच्या संचालिका शारदा अग्रवाल, सल्लागार मीनल जाजोदिया, संस्थेचे सचिव कांबळे, प्राचार्य बाबा शिंदे, व्यवस्थापक नेमीचंद अग्रवाल, राहुल अग्रवाल, अशोक अग्रवाल, प्रीती अग्रवाल, शैलेश अग्रवाल आदी उपस्थित होते.
शारदा अग्रवाल यांनी सांगितले की, ईवा एंपावर्ड वुमन्स असोसिएशनतर्फे गरीब, अनाथ आणि एकल पालक असलेल्या मुलांच्या शालेय शुल्कासाठी २१ हजार रुपयांचा धनादेश देण्यात आला. यावेळी विद्यालयाने देखील या विद्यार्थ्यांना शालेय साहित्य निशुल्क देण्याचे आश्वासन दिले.
ईवा एंपावर्ड वुमन्स असोसिएशनसोबत भगवान दास यांच्या पुण्यतिथिनिमित्त त्यांची पत्नी शांति देवी, पुत्र अशोक व राहुल आणि सून प्रीति यांनी २१ हजारांची रोख रक्कम दिली . आर्थिकदृष्ट्या मागास, अनाथ आणि एकल पालकत्व असलेली मुले अभ्यासात हुशार आहेत व जीवनात काही तरी बनायचे आहे. अशा २० गरजू मुलांसाठी ईवाने ही मदत केली आहे.
यावेळी शाळेच्या व्यवस्थापनाने त्या सर्व विद्यार्थ्यांना लागणारे सर्व शालेय साहित्य मोफत देण्याते आश्वासन दिले. याप्रसंगी प्रीति अशोक अग्रवाल म्हणाल्या की, जो विद्यार्थी शाळेत प्रथम क्रमांक मिळवेल, त्याच्या पुढील शिक्षणाचा सर्व खर्च आमच्याकडून केला जाईल.





