आयपीएलपूर्वी होणार मदतनिधी सामना
Updated On:

मुंबई : इंडियन प्रीमिअर लीगला (आयपीएल) येत्या 29 मार्चला सुरुवात होत आहे. या स्पर्धेच्या सलामीच्या सामन्यापूर्वी दिग्गज खेळाडूंना दोन संघांत विभागण्यात येऊन एक प्रदर्शनीय मदतनिधी सामना खेळविण्यात येणार आहे.
भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) आयपीएलच्या यंदाच्या मोसमाचे वेळापत्रक जाहीर केले आहे. मुंबई इंडियन्स व विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात सलामीचा सामना होणार आहे. स्पर्धेत सहभागी होत असलेल्या 8 संघांमधील स्टार खेळाडू एकाच वेळी एकाच सामन्यात सहभागी होणार आहेत. आयपीएलच्या इतिहासात प्रथमच असा सामना आयोजित केला
जात आहे.





