दुष्काळग्रस्तांना मदत करा – सुप्रिया सुळे

फुरसुंगी – जनतेने दाखवलेला विश्वास व कार्यकर्त्यांनी केलेल्या कामामुळे बारामती मतदारसंघातून पुन्हा एकदा संसदेत जाण्याची संधी मिळाली. तसेच विजयाचा जल्लोष करण्याऐवजी दुष्काळाचे चटके सोसणाऱ्या बळीराजाला दिलासा देण्याचे काम राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी करावे, असे आवाहन खासदार सुप्रिया सुळे यांनी केले.

राष्ट्रवादी कॉंग्रेसच्यावतीने हांडेवाडी येथे खासदार सुप्रिया सुळे यांचा लोकसभा निवडणुकीत विजयाची हॉट्ट्रिक केल्याबद्दल भव्य सत्कार व आभार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी त्या बोलत होत्या.

यावेळी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेश सरचिटणीस जालिंदर कामठे, नितीन घुले, निवृत्ती बांदल, गणेश शेवाळे, लक्ष्मण बांदल, अशोक न्हावले, भगवान भाडळे, किरण येप्रे, प्रवीण आबनावे, नीता भाडळे, दीपक बांदल, विक्रम शेवाळे, दत्तोबा बांदल, सुभाष टकले,जिजाबा बांदल, सुरेखा चौरे, प्रज्ञा झाम्बरे, स्वप्नील शेलार, गोविंद हांडे, तात्या भाडळे यांच्यासह राष्ट्रवादी कॉंग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सुप्रिया सुळे म्हणाल्या की, जनसामान्यांच्या अपेक्षा या राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून आहेत. परिसरातील प्रश्न सोडवण्यावर भर द्या. दुष्काळामुळे पाण्याचा व चाऱ्याचा प्रश्न भेडसावतोय, पाऊस होईपर्यंत शेतकरी वर्गाला दिलासा देण्याचे आपण करूया, असे त्यांनी सांगितले.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.

×