पुणे – करोना काळामध्ये गेरा बिल्डर्सचे एम डी रोहित कुमार गेरा (रा. वानवडी) यांना खासदार अमोल कोल्हे बोलत आहे, अशी बतावणी करून फसवणूक करण्याचा प्रयत्न करणाऱ्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, गेरा बिल्डर्सचे एम डी रोहित कुमार गेरा यांना लॉकडाउनमध्ये लोकांना काहीतरी मदत करा अशी तोतयागिरी करून फसवण्याचा प्रयत्न करणारा विशाल अरुण शेंडगे, (32 वर्षे, रा. टिळेकर नगर, कोंढवा ) व त्यास मदत करणारा सुरेश बंडू कांबळे, (रा पी एम सी कॉलोनी, गंज पेठ) यांच्याविरुद्ध वानवडी पो. स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तसेच सदर आरोपीने यापूर्वीही मी चंद्रकांत दादा बोलतोय, असे लोकसेवकाचे नावाचा वापर करून व इतर प्रकारे फसवणूक केलेली आहे. सदर आरोपीविरुद्ध 7 गुन्हे दाखल आहेत.