Video: केदारनाथकडे जाणाऱ्या हेलिकॉप्टरचा अपघात टळला; रुद्रप्रयाग-गौरीकुंड महामार्गावर आपत्कालीन लँडिंग

रुद्रप्रयाग : केदारनाथकडे जाणाऱ्या केस्ट्रेल एव्हिएशनच्या खासगी हेलिकॉप्टरला तांत्रिक बिघाडामुळे रुद्रप्रयाग-गौरीकुंड महामार्गावर आपत्कालीन लँडिंग करावे लागले. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, हेलिकॉप्टरमधील सर्व पाच प्रवासी आणि वैमानिक सुरक्षित आहेत.
बडासू हेलिपॅडवरून दुपारी १२:५२ वाजता केदारनाथकडे उड्डाण करणाऱ्या या हेलिकॉप्टरमध्ये उड्डाणानंतर काही मिनिटांतच तांत्रिक बिघाड झाल्याचे वैमानिक कॅप्टन आर.पी.एस. सोधी यांना जाणवले. त्यांनी प्रसंगावधान राखत जवळच्या महामार्गावर हेलिकॉप्टर सुरक्षितपणे उतरवले. या लँडिंगदरम्यान एक वाहन किरकोळ क्षतिग्रस्त झाले, परंतु कोणतीही जीवितहानी झाली नाही.
यह सब देखकर हेलीकॉप्टर में बैठने से डर लगता है। खैर यहां लोग सलामत हैं।
वीडियो: केदारनाथ pic.twitter.com/DS68aguKMu
— Rajesh Sahu (@askrajeshsahu) June 7, 2025
लँडिंगनंतर वैमानिकाला पाठदुखीचा त्रास जाणवल्याने त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले. सध्या त्याची प्रकृती स्थिर आहे, परंतु खबरदारी म्हणून त्याला पुढील उपचारांसाठी हायर सेंटरला पाठवण्यात आले आहे. नागरी हवाई वाहतूक महासंचालनालयाने (DGCA) या घटनेची चौकशी सुरू केली आहे.





