राज्यात पावसाचा धुमाकूळ; आजही पुणे-मुंबईसह ‘या’ जिल्ह्यांना अलर्ट जारी

Maharashtra Rain Update | राज्यात परतीच्या पावसाने धुमाकुळ घातला आहे. मुंबईसह ठाणे, रायगड, रत्नागिरी यांसह महाराष्ट्राच्या विविध जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. अनेक ठिकाणी पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे.
आजही महाराष्ट्रभरात पावसाचे संकेत आहे. मुंबई आणि उपनगरात सकाळपासून पावसाची रिमझिम सुरू असून दिवसभरात मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता व्यक्त केली जात आहे. रायगड जिल्ह्यातही पावसाचा जोर वाढल्याने अनेक नद्यांना पूर आला आहे. यामुळे नदी किनारी राहत असलेल्या नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
शेतकरी चिंतेत
राज्यभरातील जवळपास सर्वच भागातील पिके वाया गेली आहेत, यामुळे शेतकरी चिंतेत आहे. बुलढाणा जिल्ह्यातील चिखली, देऊळगाव राजा या तालुक्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस झाला. या पावसामुळे नुकसान झालेल्या सोयाबीन, उडीद, मूग आणि कापूस या पिकांना फटका बसण्याची शक्यता आहे.
तर जालना शहरात मध्यरात्री ढगफुटीसदृश्य पाऊस झाला. ज्यामुळे शहरात अनेक ठिकाणी पाणी साचले आहे. तसेच रस्त्यांना नद्यांचे स्वरूप आले. तसेच काही ठिकाणी वाहतूक सेवा देखील थांबवण्यात आली आहे. अनेक घरांमध्ये आणि दुकानांमध्ये पाणी शिरले आहे. Maharashtra Rain Update |
सोलापूर जिल्ह्याला पावसाचा फटका
याशिवाय सोलापूर जिल्ह्यातही करमाळा तालुक्यातील सीना नदीला आलेल्या पुरामुळे सीना नदीवरील संगोबा पूल पाण्याखाली गेला आहे. यामुळे खबरदारी म्हणून प्रशासनाने हा पूल वाहतुकीसाठी बंद केला आहे. अक्कलकोट तालुक्यातही अतिवृष्टीमुळे खैराट गावात नागरिकांच्या घरात पाणी शिरले आहे.
अलर्ट जारी
आजही पुणे, रायगड, सातारा, कोल्हापूर, रत्नागिरी, नाशिक, अहिल्यानगर, सांगली, सोलापूर, जालना, छत्रपती संभाजीनगर, बीड, हिंगाली, बुलढाणा याशिवाय विदर्भातील सर्व जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे. रायगड जिल्ह्याला मंगळवारसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर धुळे, नंदुरबार, जळगाव या जिल्ह्यांना पुढच्या चार दिवसांसाठी पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. Maharashtra Rain Update |
हेही वाचा:
धनंजय मुंडे पुन्हा अडचणीत; ‘त्या’ विधानावरून बंजारा समाज आक्रमक





