पुण्यात पावसाची जोरदार हजेरी; पुणेकरांना मिळाला उकाड्यापासूुन दिलासा

Rain in many parts of Pune : गेल्या सात दिवसांपासून पुण्यात उन्हाची झळ कमी जाणवत होती. तसेच कमाल तापमानात देखील ७ अंशांची घसरण झाली असून आज दुपारी पुण्यातील अनेक भागांमध्ये पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. यामुळे वातावरणात बदल होऊन थंडावा निर्माण झाला आहे. कोंढवा परिसरात जोरदार पाऊस सुरू असून कात्रज, कोथरूड या भागांमध्येही पावसाला सुरूवात झाली आहे.
दरम्यान, नुकताच हवामान विभागाने पुण्याला येलो अर्लट जारी केला आहे. तसेच आजपासून पुढचे तीन दिवसात वादळी वाऱ्यासह पाऊस कोसळणार असल्याची शक्यता वर्तवली होती. हवामान विभागाच अंदाज खरा ठरत असून आज दुपारी पुण्यातील विविध भागात पावसाने दमदार हजेरी लावली आहे. यामुळे नागरिकांना उकाड्यापासून दिलासा मिळाला आहे.
मात्र, पाऊस असाचा सुरू राहिला तर त्याचा थेट परिमाण वाहतूक व्यवस्थेवर होणार असल्याचे सांगितले जात आहे. यामुळे पुणे जिल्हा प्रशासनाने नागरिकांना सावधानगिरी बाळगण्याचे आवाहन केले आहे.
पुण्यासह मध्य महाराष्ट्रातील नंदुरबार, धुळे, जळगाव, नाशिक, सातारा आणि कोल्हापूर, मराठवाड्यातील, छत्रपती संभाजीनगर, तसेच विदर्भातील यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली येथे वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता असल्याने हवामान विभागाने म्हटले आहे. १२ मे पर्यंत हे थंड तापमान कायम राहण्याची अपेक्षा असून या पावसामुळे नागरिकांना दिलासा मिळाला आहे.





