कोल्हापूर जिल्ह्यात मुसळधार:12 प्रकल्पातून प्रतिसेकंद 36 हजार क्यूसेकचा विसर्ग

कोल्हापूर (प्रतिनिधी)- कोल्हापूर जिल्ह्यातील धरण पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर वाढलाय. त्यामुळं राधानगरी, दुधगंगा, वारणा सह 12 प्रकल्पातून प्रतिसेकंद 36 हजार क्यूसेकचा विसर्ग नदीपात्रात सुरू आहे.
जिल्ह्यात सर्वत्र पावसाचा जोर वधल्याने 46 बंधारे पाण्याखाली पाण्याखाली गेले आहेत. विशेष म्हणजे जिल्ह्याची वरदायिनी असणारे राधानगरी धरणाचे स्वयंचलित दरवाजा क्र- 3, 5 आणि 6 उघडेच असून पावसाचा जोर अजून वाढल्यास धरणाचे उर्वरित स्वयंचलित दरवाजे उघडण्याची शक्यता देखील निर्माण झाली आहे.
कडवी मध्यम प्रकल्प 100% भरला असून राजाराम बंधाऱ्याची पाणी पातळी 32 फूट पाच इंच आहे. पंचगंगेच्या पाणी पातळीत 24 तासांत 5 फुटांची वाढ झाली असून पंचगंगा, भोगावती, कुंभी सह जिल्ह्यातील सर्व नद्यांच्या पाणी पातळीत कमालीची वाढ झालीय.अलमट्टी धरणातून 82 हजार क्यूसेक चा विसर्ग सुरू असून सध्या पश्चिम महाराष्ट्रातील धरणातील मोठा विसर्ग नदीपात्रात मिसळत असल्याने अलमट्टी धरणातून विसर्ग वाढण्याची शक्यता देखील निर्माण झाली आहे दरम्यान हवामान खात्यानं पुढील चार दिवस कोल्हापूरच्या पश्चिम घाट माथ्यावर जोरदार अतिवृष्टी होणार असल्याचा इशारा दिल्यामुळे पुन्हा एकदा कोल्हापूरला पूरस्थिती निर्माण होईल की काय अशी शक्यता निर्माण झाली आहे.





