पुणे जिल्हा | इंदापूर शहरात दमदार पावसाची हजेरी

इंदापूर, (प्रतिनिधी) – शहरामध्ये मंगळवारी (दि. 4) दुपारी चारच्या दरम्यान जोरदार पावसाने हजर लावली. तब्बल दोन ते तास चाललेल्या या पावसामुळे उष्णतेच्या लाहीपासून इंदापूरकरांची मुक्तता झाली. तसेच गेल्या महिन्यापासून टंचाईने ग्रासलेल्या भागांना काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे.
गेल्या अनेक दिवसापासून तालुक्याच्या विविध भागांमध्ये पाण्याची तीव्रतांचा निर्माण झालेली होती तसेच तीव्रतेने सर्वसामान्य जनता ग्रासली होती; मात्र मुसळधार पावसापासून शहरासह ग्रामीण भाग वंचित होता. यादरम्यान मंगळवारी दुपारी चार वाजता मुसळधार पावसाने हजेरी लावली.यामुळे शहरातील व्यापार्यांची चांगलीच धावपळ उडाली तसेच रस्त्याच्या अनेक भागांमधून जोरदार पाणी वाहत होते.
पावसात कार्यकर्त्यांचा जल्लोष
इंदापूर तालुक्यात लोकसभा निवडणुकीत सुनेत्रा पवार यांना विक्रमी मतदान मिळेल अशी भूमिका इंदापूर तालुक्याचे आजी-माजी आमदार यांनी व्यक्त केली होती; मात्र निवणुकीच्या निकालात खासदार सुप्रिया सुळे यांनी सामान्य जनतेच्या जोरावर यशस्वी मताधिक्य मिळवले. त्यामुळे सामान्य नागरिकांनी भर पावसात देखील गुलालाची उधळण करत जल्लोष केला.





