गडचिरोली जिल्ह्यात अतिवृष्टी, पुराचा धोका; दोन हजार नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविले
Updated On:

गडचिरोली – गडचिरोली जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे पर्लकोटा नदीला पूर आल्याने भामरागड, हेमलकसा येथे पूर परिस्थिती निर्माण झाली असून दक्षिण गडचिरोलीत पूर कायम असल्याने 2345 लोकांना सुरक्षितस्थळी हलविले आहे.
जिल्ह्यात 10 जुलैपासून मोठ्या प्रमाणात पावसाने हजेरी लावल्यामुळे प्रमुख नद्यांसह छोट्या नाल्यांमधून पाणी वाहत आहे. आणखी दोन दिवस मुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आल्याने बुधवार 20 जुलै पर्यंत जिल्हा प्रशासनाने आत्यावश्यक सेवा वगळता शाळा व इतर आस्थापना बंद राहणार याबाबत आदेश निर्गमित केले आहे.





