कोयनेत दमदार पाऊस! २४ तासांत ७४ मिलीमीटर पावसाची नोंद, धरणात १६ टीएमसी पाणीसाठा
Updated On:

कोयनानगर – कोयना धरण परिसरात गेल्या २४ तासांत ७४ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. पावसाचा जोर वाढत असून गडद ढगांची सततची उपस्थिती आणि विजांच्या कडकडाटासह सरी चालू आहेत. यामुळे कोयना धरणाच्या साठ्यात वाढ होऊन सध्या १६ टीएमसी पाणीसाठा नोंदवला गेला आहे.
हवामान विभागाने पुढील २४ तासांसाठी ‘यलो अलर्ट’ जारी केला असून, कोयना खोऱ्यातील नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. पावसामुळे काही भागांत धुके निर्माण झाले असून वाहनचालकांनी विशेष काळजी घेण्याची सूचना प्रशासनाने दिली आहे.
धरण प्रशासन, आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा आणि पाटण तालुका प्रशासन सतर्क असून, कोयना नदीच्या किनारी व दरडप्रवण भागात रहिवाशांना सावधगिरी बाळगण्याचे आवाहन करण्यात आले आहे.





