दिल्लीमध्ये पावसाचे थैमान! नवीन संसद भवन गेले पाण्यात; रस्तेही जलमय

Delhi Rain | दिल्लीमध्ये बुधवारी सायंकाळी मुसळधार पाऊस झाला. यामुळे अनेक ठिकाणी रस्त्यावर पाणी साचले होते. इतकेच काय तर या पावसामुळे नवीन बांधण्यात आलेली संसद भवन पाण्यात गेल्याचे पाहायला मिळाले. संसदेच्या मकरद्वारजवळही पाणी साचले आहे. याचा व्हिडिओ देखील सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
दिल्लीतील लोक मागील काही दिवसांपासून उष्णतेने हैराण झाले होते, दरम्यान पावसाने उष्णतेपासून दिलासा दिला असला तरी पाणी साचल्याने लोकांच्या अडचणी वाढल्या आहेत. दिल्लीत अनेक रस्त्यांवर आणि घरांमध्ये पाणी साचले आहे. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे.
#WATCH | Delhi: Waterlogging witnessed at the Makar Dwar of Parliament after incessant rainfall in the national capital. pic.twitter.com/41qZhDASUZ
— ANI (@ANI) July 31, 2024
रेड अलर्ट जारी
याशिवाय दिल्लीतील काही भागात हवामान खात्याने रेड अलर्ट जारी केला आहे. दिल्ली आणि आसपासच्या जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस पडला आहे. रस्तेही जलमय झाल्याने वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. गुडघाभर पाण्यातून लोकांना मार्ग काढावा लागला. तसेच अनेक विमानेही रद्द करण्यात आली.
तीन विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू झाला होता Delhi Rain |
दरम्यान, 27 जुलै रोजी दिल्लीतील ओल्ड राजेंद्र नगर भागात मुसळधार पावसानंतर राव आयएएस कोचिंग सेंटरच्या इमारतीच्या तळघरात पाणी साचल्याने तीन विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी दिल्ली पोलिसांनी कोचिंग सेंटरचा मालक आणि समन्वयक यांना ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी या प्रकरणी बीएनएस कलम 105,106(1),152,290 आणि 35 अंतर्गत एफआयआर नोंदवला आहे.
हेही वाचा:
दिल्लीत पावसाचा तांडव..! नाल्यात पडून माय – लेकाचा ‘मृत्यू’





