Pune Rural : भीमाशंकर-डिंभे धरण परिसरात मुसळधार पाऊस; घोड नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

मंचर : भीमाशंकर व डिंभे धरण परिसरात गेल्या दोन दिवसांपासून मुसळधार पावसाची संततधार सुरू आहे. मुसळधार पावसामुळे नद्या-नाले तुडुंब भरले असून धरण परिसरातील पाणीपातळीत झपाट्याने वाढ झाली आहे. वाढत्या पावसामुळे आणि वाढलेल्या विसर्गामुळे घोड नदीकाठच्या गावांना प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे.
डिंभे धरणातून मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू असून घोड नदीपात्र भरून वाहत आहे. त्यामुळे नदीकाठच्या खेड्यांतील नागरिकांनी सतर्क राहावे, अनावश्यकपणे नदीपात्रात जाणे टाळावे, तसेच गावोगावी आपत्कालीन यंत्रणांना सज्ज राहण्याचे आदेश प्रशासनाकडून देण्यात आले आहेत. मुसळधार पावसामुळे परिस्थिती गंभीर होऊ नये यासाठी ग्रामपंचायतींनी व नागरिकांनी विशेष काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
पावसाची नोंद (दि. 20 ऑगस्ट, सकाळी ६ वा.)
भीमाशंकर – 342 मि.मी.
राजपुर – 182 मि.मी.
आंबेगाव – 78 मि.मी.
डिंभे धरण साईट – 99 मि.मी.
आसाणे – 162 मि.मी.
आहुपे – 227 मि.मी.
डिंभे धरण (हुतात्मा बाबू गेनू जलाशय) स्थिती
(दि. 20 ऑगस्ट, सकाळी ६ वा.)
पाणीपातळी – 718.70 मीटर
धरण साठा – 98.09 %
एकूण साठा – 375.32 Mcum (13256.48 Mcft)
उपयुक्त साठा – 347.00 Mcum (12256.48 Mcft)
विसर्गाचा तपशील
सांडवा मार्फत घोड नदीपात्रात – 15,910 क्युसेक
वीज घरातून – 450 क्युसेक
उजवा कालवा – 100 क्युसेक
एकूण विसर्ग – 16,460 क्युसेक





