पुणे – कोंढव्याजवळील एका फर्निचरच्या गोडाऊनला भीषण आग लागली आहे. या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या 4 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत.
कोंढव्यामधील धर्मावत पेट्रोल पंपाजवळील गोडाऊनला आग लागली आहे. गोडाऊनमध्ये फर्निचर व टर्पेंटाईनचे बॅरेल असल्याने आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी जवानांना शर्थीचे प्रयत्न करावे लागत आहे. सुदैवाने आगीत कोणीही जखमी झालेले नाही. दरम्यान, आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.