हजमध्ये उष्णतेमुळे १४ जणांचा मृत्यू! 2,700 हून अधिक लोकांची प्रकृती खालावली ; सौदीकडून भाविकांसाठी आवाहन

Heat in saudi arabia। सौदी अरेबियातुन एक चिंताजनक बातमी समोर येत आहे. याठिकाणी हजला गेलेल्या 14 भाविकांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. रविवारी अति उष्णतेमुळे हे मृत्यू झाल्याचे स्थानिक अधिकाऱ्यांनी सांगितले. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, हे सर्व लोक जॉर्डनचे होते.
जॉर्डनच्या सरकारी न्यूज एजन्सीने दिलेल्या माहितीनुसार, जॉर्डनच्या परराष्ट्र मंत्रालयाने, मृत्युमुखी पडलेल्या 14 नागरिकांव्यतिरिक्त अन्य 17 लोक बेपत्ता आहेत. उष्माघातामुळे 6 जणांचा मृत्यू झाल्याचे मंत्रालयाने यापूर्वी सांगितले होते. बेपत्ता झालेल्या 17 लोकांचा शोध सुरू असून मृत्यू झालेल्यांचे मृतदेह जॉर्डनला आणण्याची तयारीही सुरू आहे. सौदी अरेबियामध्ये खूप उष्मा आहे आणि दरम्यान, मक्का येथे गेल्या शुक्रवारी संध्याकाळी हजला सुरुवात झाली.
सनस्ट्रोकची 2,760 प्रकरणे नोंदवली Heat in saudi arabia।
सौदीच्या हवामान अधिकाऱ्यांनी सांगितले की, रविवारी मक्का शहरातील तापमान 47 अंशांवर पोहोचले आणि मीना शहरातील तापमान 46 अंशांवर पोहोचले. सौदीच्या आरोग्य मंत्रालयाचे प्रवक्ते मोहम्मद अल-अब्दुलाली यांनी पत्रकारांना सांगितले की, एकट्या रविवारी उष्माघात आणि सनस्ट्रोकची 2,760 प्रकरणे नोंदवली गेली. ते म्हणाले की बाधित लोकांची संख्या आणखी वाढू शकते, त्यामुळे यात्रेकरूंनी सूर्यप्रकाश टाळावा आणि पाणी प्यावे. ते म्हणाले, ‘उष्णता हे आमच्यासाठी मोठे आव्हान आहे.’
यंदा 14 जूनपासून हजला सुरुवात झाली असून ती 19 जूनपर्यंत चालणार आहे. हजसाठी जगभरातून लाखो मुस्लिम सौदी अरेबियातील पवित्र शहर मक्का येथे पोहोचले आहेत. इस्लाममध्ये शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या सक्षम मुस्लिमांना हज करणे अनिवार्य आहे.
गेल्या वर्षीही शेकडो लोकांचा मृत्यू Heat in saudi arabia।
गेल्या वर्षी सुमारे 20 लाख मुस्लिम हजसाठी सौदी अरेबियात पोहोचले होते. या कालावधीत 240 लोकांचा मृत्यू झाला, त्यापैकी बहुतेक इंडोनेशियातील होते. मात्र, त्यांच्या मृत्यूचे कारण स्पष्ट झाले नाही. सौदीच्या एका अधिकाऱ्याने एएफपी या वृत्तसंस्थेला सांगितले की, गेल्या वर्षी उष्णतेशी संबंधित आजारांची १०,००० प्रकरणे होती, त्यापैकी १०% उष्माघाताची प्रकरणे होती.
मक्का येथील पवित्र स्थळांना भेट देण्यासाठी सौदी अरेबिया दरवर्षी मोठी व्यवस्था करते, मात्र प्रचंड गर्दी आणि कडक उन्हामुळे हाजी आणि पोलीस अधिकाऱ्यांना अडचणींचा सामना करावा लागतो.





