Palghar Accident News : पालघर शहरात एक हृदयद्रावक अपघाताची घटना घडली असून, मालगाडीच्या धडकेत तीन तरुणांचा जागीच मृत्यू झाला आहे. ही घटना पालघर पूर्वेतील जुना पालघर भागातील जैन मंदिराजवळ घडली. अपघातानंतर संपूर्ण परिसरात शोक आणि संतापाची लाट पसरली आहे. मृतकांची नावे स्वप्निल शैलेश पालांडे (२३), कुणाल कुमार दुबळा (२३) आणि अफरोज खलील शेख (२८) अशी आहेत. हे तिघेही पालघर पूर्वेतील वीरेंद्र नगर परिसरातील रहिवासी होते. या दुर्दैवी घटनेमुळे त्यांच्या कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून, नातेवाईक आणि स्थानिक नागरिक शोकाकुल झाले आहेत. Palghar Accident News हेही वाचा : Muralidhar Mohol : मंत्री मुरलीधर मोहोळ रुग्णालयात दाखल; फोटो शेअर करत स्वतः दिली माहिती, त्यांना नेमकं काय झालयं? नातेवाईकांनी पोलिसांवर गंभीर आरोप केले आहेत. त्यांच्या म्हणण्यानुसार, अपघातापूर्वी काही पोलिस कर्मचारी घटनास्थळी आले होते आणि तरुणांना मारहाण केली. पोलिसांच्या भीतीने ते पळू लागले आणि पळताना जवळील रेल्वे रुळ ओलांडण्याचा प्रयत्न करत असताना मालगाडीने त्यांना धडक दिली. या आरोपांमुळे परिसरात पोलिसांविरोधात संताप व्यक्त केला जात आहे. Palghar Accident News पालघर अपघात दरम्यान, अपघाताची माहिती मिळताच जीआरपी पथक घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी तिघांचा मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवले आहेत. या प्रकरणाचा सध्या तपास सुरू असून, तपासानंतर अपघाताचे नेमके कारण आणि आरोपांची सत्यता समोर येईल, अशी माहिती पोलिसांनी दिली. ही घटना पालघर पूर्व परिसरात मोठी खळबळ उडवून देणारी ठरली आहे. तरुणांच्या अकाली निधनामुळे कुटुंबीय आणि परिसरातील लोकांमध्ये दुःख आणि रोष दोन्ही भावना दिसत आहेत. Palghar Accident News हेही वाचा : Pune News : स्वारगेट चौकात दोन दिवसांत ३७५ बेशिस्त रिक्षाचालकांवर कारवाई