विदिशा – मध्य प्रदेशातील विदिशा येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. लग्न समारंभात स्टेजवर नृत्य करत असतानाच एक तरूणी अचानक खाली पडली आणि पुन्हा उठूच शकली नाही. अचानक घडलेल्या या घटनेमुळे गोंधळ उडाला. घटनास्थळी उपस्थित असलेल्या लोकांनी मुलीला उचलून रुग्णालयात नेले. रुग्णालयात डॉक्टरांनी मुलीला मृत घोषित केले. मुलीच्या मृत्यूमुळे लग्नातील आनंदाचे वातावरण अचानक दु:खात परावर्तीत झाले.
मृत्यूचे कारण हृदयविकार असल्याचे सांगितले जात आहे. मृत्यूचा लाइव्ह व्हिडिओ देखील समोर आला आहे. व्हिडिओमध्ये स्टेज रंगीबेरंगी दिव्यांनी सजवलेले दिसत आहे. वातावरणही लग्नाच्या आनंदाने भरलेले असते. ती मुलगी स्टेजवर आनंदाने नाचत आहे. नाचत असताना, मुलगी अचानक पडते.
जेव्हा ती बराच वेळ उठली नाही, तेव्हा लग्न समारंभातील लोकांना काहीतरी अनुचित घडल्याची भीती वाटली. त्यांनी मुलीला डान्स फ्लोअरवरून उचलले. मुलीला उचलून रुग्णालयात नेण्यात आले. डॉक्टरांनी रुग्णालयात तपासणी केली. तपासणीनंतर मुलीला मृत घोषित करण्यात आले. मुलीचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने झाला असावा असा संशय आहे.