मोठी बातमी! बारावीच्या परीक्षांसंबंधात 31 मे रोजी सुनावणी
Updated On:

नवी दिल्ली – कोविडच्या पार्श्वभूमीवर सीबीएसई बोर्डाच्या बारावीच्या परीक्षा रद्द कराव्यात, अशी मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली असून त्यावर येत्या 31 मे रोजी सुनावणी होणार आहे.
हा विषय आता सुप्रीम कोर्टाने सुनावणीसाठी घेतला असल्याने देशातल्या अन्य हायकोर्टांनी यावर आता कोणतीही सुनावणी घेऊ नये, अशी विनंती सीबीएसई बोर्डाच्या वकिलांनी यावेळी केली. त्यावर सुप्रीम कोर्टाने सोमवारपर्यंत या विषयावर काहीही होणार नाही, अशी ग्वाही सीबीएसई बोर्डाच्या वकिलांना दिली.
कोविडमुळे बारावीच्या परीक्षा रद्द कराव्यात, अशी मागणी अनेक विद्यार्थी व पालकांनी केली असली तरी बोर्डाने मात्र अजून त्यावर कोणताही निर्णय घेतलेला नव्हता. त्यामुळे 31 मे रोजी होणाऱ्या सुनावणीत या विषयीचे चित्र स्पष्ट होईल, असे सांगितले जात आहे.





