Santosh Deshmukh | मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी बीडच्या विशेष मकोका न्यायालयात सुनावणी होणार आहे. वाल्मीक कराडला जेल की बेल बीडच्या विशेष मकोका न्यायालयात फैसला होणार आहे. वाल्मीक कराडच्या दोष मुक्तीच्या अर्जावर आणि प्रॉपर्टी जप्तीच्या अर्जावर आज न्यायालय निर्णय देणार आहे. या सुनावणीसाठी खासदार झाल्यानंतर प्रथमच विशेष सरकारी वकील उज्वल निकम हे उपस्थित राहणार आहेत. संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख हे देखील उपस्थित असतील. त्यामुळे आज न्यायालय काय निर्णय देणार याकडे राज्याचे लक्ष लागले आहे. दरम्यान, माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्या निकटवर्तीय म्हणून वाल्मिक कराड ओळखले जातात. संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर मुंडे यांच्यावर मंत्रिपदाचा राजीनामा देण्यासाठी दबाव होता. त्यानंतर त्यांनी प्रकृतीचे कारण देत मंत्रिपदाचा राजीनामा दिला. Santosh Deshmukh | हेही वाचा : जगदीप धनखड यांच्या राजीनाम्यावरून राजकारण ; निशिकांत दुबे म्हणाले,”काँग्रेसने किमान त्या व्यक्तीच्या…”