Satara | हिल मॅरेथॉनसाठी आरोग्य सेवा सज्ज

सातारा, (प्रतिनिधी) – हिल मॅरेथॉननिमित्त देशविदेशातून सहभागी होणाऱ्या स्पर्धकांसाठी आरोग्य सेवा पुरविण्यासाठी मॅरेथॉन समिती सज्ज झाली आहे.
ठिकठिकाणी आरोग्य पथक, केली आहे, तसेच प्रत्येक बुधवरील स्वयंसेवकांना अत्यावश्यक देण्याचे सीपीआर ट्रेनिंग, कार्डियाक अॅम्ब्युलन्स सज्ज ठेवली आहे, अशी माहिती मॅरेथॉन समितीचे वैद्यकीय प्रमुख डॉ. प्रतापराव गोळे यांनी दिली.
डॉ. गोळे म्हणाले, “सातारा हिल मॅरेथॉन यंदा तेराव्या वर्षांत पदार्पण करीत आहे. एक सप्टेंबरला स्पर्धा होणार असून, मॅरेथॉन समितीच्या वतीने धावकांना पाणी, ओआरएस, रिफ्रेशमेंट देणारे मदतनीस असतील. त्याच ठिकाणी आपण डॉक्टरांसह कार्डियाक अॅम्ब्युलन्सदेखील उपलब्ध प्रत्येक वर्षी करते.
स्पर्धेदरम्यान धावकांच्या आरोग्याची काळजी घेणे आणि मॅरेथॉन स्पर्धा पूर्ण झाल्यानंतर फिजिओथेरपी आणि रिकव्हरीच्या माध्यमातून धावकांना मदत करणे आवश्यक आहे.
सर्वच धावकांनी डॉक्टरांशी चर्चा करून आवश्यक त्या तपासण्या करून घ्याव्यात. तिशी पार केलेल्या स्पर्धकांनी रक्त व हृदयासंबंधी तपासण्या करून घेणे अपेक्षित आहे.
मॅरेथॉनच्या अंतिम टप्प्यात धावपटू थकण्याची शक्यता जास्त असते. धावताना कोणालाही त्रास झाल्यास त्यांना तातडीने मदत करण्यासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील विद्यार्थी, तसेच ढाणे क्लासेसचे विद्यार्थी तत्पर असतात.
या टप्प्यात अत्याधुनिक एईडी व फिजिशियन हे देखील उपलब्ध असतात. ” त्याचबरोबर प्रतिभा हॉस्पिटलच्या माध्यमातून अत्याधुनिक व सर्व सुविधांयुक्त अतिदक्षता विभागाची उपलब्धता ही स्पर्धेचे मोठे वैशिष्ट्य आहे.
साताऱ्यातील हृदयरोग तज्ज्ञ डॉ. सोमनाथ साबळे व त्यांची टीम धावकांना मदत करण्यासाठी सुसज्ज असते.
धावकांना मॅरेथॉनदरम्यान झालेल्या शारीरिक कष्ट व मसल, तसेच जॉइंटला झालेल्या अतिश्रमातून त्यांची रिकव्हरी वेगाने व्हावी, यासाठी तज्ज्ञ फिजिओथेरपीची 60 जणांचे पथक, तसेच सहा अॅक्युप्रेशर तज्ज्ञांची पथक सर्व धावकांना सेवा देते.
संपूर्ण तयारीनिशी मॅरेथॉनमध्ये आपल्या सरावाशी सुसंगत धाव घेताना कुठेही आपण स्वत:ला हानी पोचणार नाही, याची दक्षता घ्यावी, असेही आवाहन डॉ. गोळे यांनी केले आहे.





