Health Tips: जर तुम्ही वजन कमी करण्यासाठी जिम, डाएटिंग आणि वॉकिंगचे असंख्य प्रयोग करूनही काही फरक पाहिला नसेल, तर न्यूट्रिशनिस्ट यांनी सांगितलेला हा सोपा आणि नैसर्गिक उपाय तुमच्यासाठी उपयुक्त ठरू शकतो. त्यांच्या म्हणण्यानुसार, हे ड्रिंक दररोज घेतल्यास फक्त ३० दिवसांत शरीरातील चरबी कमी होऊ शकते. वजन कमी करण्यासाठी जादुई ड्रिंक “आपण दिवसाला १०,००० पावले चालतो, वेळेवर खातो, डाएट पाळतो, पण तरीही वजन कमी का होत नाही? कारण आपले मेटाबॉलिझम कमी गतीने काम करते.” न्यूट्रिशनिस्ट यांनी सांगितलेले हे नैसर्गिक पेय शरीरातील चरबी कमी करण्यासोबतच पचन क्रिया सुधारते आणि मेटाबॉलिझम वाढवते. या ड्रिंकसाठी खालील घटक लागतात: ३ चमचे मेथी दाणे ३ चमचे हळद पावडर ३ चमचे ओवा ३ चमचे बडीशोप २ तुकडे दालचिनीचे आणि गरम पाणी तयार करण्याची पद्धत १. सर्व घटक (मेथी, हळद, ओवा ,बडीशोप, दालचिनी) एकत्र मिक्सरमध्ये बारीक करून पावडर तयार करा. २. या पावडरचा एक मोठा चमचा घ्या आणि तो गरम पाण्यात मिसळा. ३. हे मिश्रण दुपारच्या आणि रात्रीच्या जेवणाच्या अर्धा तास आधी प्या. ३० दिवसांत होईल बदल न्यूट्रिशनिस्ट यांच्या मते, हे ड्रिंक नियमित घेतल्यास ३० दिवसांत स्पष्ट फरक दिसून येईल. यामुळे, वजन कमी होईल पचन सुधारेल मेटाबॉलिझम वाढेल शरीर हलके आणि ऊर्जावान वाटेल हा उपाय केवळ सामान्य माहिती म्हणून दिला आहे. कोणताही घरगुती उपाय सुरू करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.