Health: भारतीय स्वयंपाकघरातील सुगंध आणि चवीसाठी ओळखली जाणारी इलायची म्हणजेच मसाल्यांची राणी. मिठाईपासून रोजच्या जेवणापर्यंत तिचा वापर होतो. पण इलायचीचा फायदा केवळ चवीपुरताच मर्यादित नाही तर ती शरीरासाठी औषधासारखी काम करते. आयुर्वेद तज्ज्ञांच्या मते, रोजच्या आहारात प्रमाणात इलायचीचा समावेश केल्यास अनेक आरोग्यसमस्या दूर राहतात आणि शरीर तंदुरुस्त राहते. इलायचीचे प्रमुख आरोग्यदायी फायदे १. रक्तदाब नियंत्रित ठेवते इलायचीमध्ये मॅग्नेशियम आणि पोटॅशियम भरपूर असते. हे घटक रक्ताभिसरण सुधारतात आणि ब्लड प्रेशर नियंत्रित ठेवण्यास मदत करतात. २. पचन सुधारते गॅस, ऍसिडिटी, अपचन अशा समस्यांमध्ये इलायची खूप फायदा करते. जेवणानंतर एक-दोन इलायच्या खाल्ल्यास पचन सुधारते आणि पोट हलके वाटते. ३. कॅन्सरविरोधी गुण इलायचीमध्ये असलेले अँटी-इन्फ्लेमेटरी घटक कॅन्सरशी लढण्यास सहाय्यक आहेत. विशेषतः तोंड आणि त्वचेच्या कॅन्सरपासून बचाव होण्यास मदत होते. ४. श्वसनाच्या तक्रारींमध्ये लाभदायक इलायची हलकी उष्ण असल्याने, दमा, श्वास घेण्यातील त्रास, थंडी-खोकला अशा समस्यांमध्ये आराम मिळतो. रात्री कोमट पाण्यासोबत इलायची चावून खाल्ल्यास घसा दुखणे आणि खवखव कमी होते. ५. डायाबिटीजमध्ये सहाय्यक अनेक संशोधनांनुसार, इलायचीतील अँटिऑक्सिडंट्स शरीरातील इन्सुलिन लेव्हल संतुलित ठेवण्यास मदत करतात. त्यामुळे मधुमेह असलेल्या व्यक्तींना फायदा होतो. ६. अल्सर आणि सूज कमी करते इलायचीचे नियमित सेवन पोटातील अल्सर कमी करण्यास मदत करते. तसेच शरीरातील सूज, अॅलर्जी आणि दीर्घकालीन इंफ्लेमेशन कमी करण्यातही ती प्रभावी आहे. ७. तोंडाची दुर्गंधी दूर करते जेवणानंतर इलायची खाल्ल्यास, तोंडाची दुर्गंधी दूर होते, दातांवरील कॅव्हिटीज कमी होतात, उलटी किंवा मळमळ होणे थांबते. महत्त्वाची सूचना इलायचीचे फायदे अनेक असले तरी, आपण ती मर्यादित प्रमाणात घ्यावी. एखादी आजारपणाची समस्या असेल तर वापरण्यापूर्वी आयुर्वेद तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.