पुणे – जिल्हा परिषदेचे आरोग्य आणि बांधकाम सभापती प्रमोद काकडे यांना करोना संसर्ग झाल्याचे समोर आले. आरोग्य सभापती काकडे यांच्या करोना चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यावर त्यांच्या पत्नीचीही टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे.
सध्या, ते पुण्यातच गृह विलगीकरण झाले आहेत. काकडे यांनी त्यांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींना विलगीकरण होण्याचे आवाहन केले आहे.
गेली वर्षभर जिल्ह्याच्या ग्रामीण भागात करोना नियंत्रणासाठी काकडे यांनी सर्व तालुक्यांमध्ये जाऊन बैठका घेतल्या. कोविड केअर सेंटर्स सुरू केली.
तसेच कोविड हॉस्पिटल आणि विप्रो हॉस्पिटल सुरु करून करोना रुग्णांना उपचार आणि सुविधा देण्यासाठी प्रयत्न केले. आपल्याला कुठलाही त्रास होत नसून आपण गृह विलगीकरण मध्ये आहोत, असे काकडे यांनी सांगितले.