आरोग्य वार्ता : हसत खेळत शुगर कंट्रोल

डायबिटीस लहानांपासून तर मोठ्यांपर्यंत कोणत्याही वयोगटातील स्त्री-पुरुषांना होऊ शकतो. डायबिटीसचे नुसत नाव जरी काढलं तरी प्रत्येकाच्या अंगाला काटा येतो. कारण डायबिटीसचे पेशंट लवकर बरे होत नाहीत. पण दैनंदिन जीवनात योग्य काळजी घेतली तर डायबिटीस नियंत्रणात आणता येतो. डायबिटीसला ब्लड शुगर, मधुमेहसुद्धा म्हणतात.
आपल्या शरीरातील पॅनक्रियांजमध्ये इन्सुलिनचे प्रमाण कमी होते तेव्हा ग्लुकोजचे प्रमाण वाढते यालाच डायबेटीस आहे असे म्हटले जाते. आता इन्सुलिन म्हणजे नेमके काय तर हा आहे एक प्रकारचा हार्मोन, जो शरीरात रक्तातील ग्लुकोज नियंत्रित ठेवतो. याचे काम असते अन्नापासून ऊर्जा बनविणे.
जगभर 2021 मध्ये 52 करोडपेक्षा जास्त लोकांना डायबिटीस होता. संपूर्ण विश्वासाठी ही खूप मोठी चिंताजनक बाब आहे. लान्सेट प्रकाशित एकका अभ्यासानुसार भारतात डायबिटीस जास्त प्रमाणात वाढत असून 11 करोड लोक डायबिटीसशी झुंजत आहेत.आता असे लक्षात आले आहे की, 2050 पर्यंत जगभर 131 करोड लोक डायबिटीसचे शिकार होऊ शकतात.
पुरुषांच्या तुलनेत स्त्रियांमध्ये डायबिटीसचे प्रमाण जास्त आढळून येते. स्त्रियांना पीसीओएसमुळे शरीरात ग्लुकोजचे प्रमाण वाढल्यास यामुळे अनियमित पिरियडस्, वजन वाढणे, चेहऱ्यावर मुरूम उठणे, डिप्रेशन अशा समस्या उद्भवू शकतात.
डायबिटीची लक्षणे :
ब्लड शुगरचे प्रमाण जास्त असेल तर चक्कर येणे, हार्ट अटॅक येणे ही लक्षणे दिसून येतात. रक्तात ग्लुकोजची पातळी जास्त काळापर्यंत वाढलेली असेल तर यामुळे डोळ्यांच्या क्षमतेवरही परिणाम होताना दिसतो. रुग्णाला अंधुक दिसायला लागते.
टाईप वनच्या डायबिटीसची लक्षणे :
जास्त तहान लागणे, हात-पाय बधीर होणे, वांरवार भुक लागणे, पोटात दुखणे, जीव घाबरायला लागणे, दम लागणे, अंधुक दिसणे, त्वचेवर चकते पडणे, अधिक लघवी होणे, मेटॉबोलिक प्रोसेसमध्ये झालेल्या गडबडीमुळे रक्तात ग्लुकोजचे प्रमाण जास्त होते. त्यामुळे पायांमध्ये सुया टोचल्यासारखे जाणवते व चालताना त्रास होतो. याला पेरीफेरल डायबिटीक न्यूरोपॅथी म्हणतात.
डायबिटीस रेटिनोपॅथी : डोळ्यांच्या रेटीनामध्ये असलेली रक्तवाहिनी डॅमेज होऊ शकते. त्यामुळे आंधळेपणा येऊ शकतो.
टाईप टू डायबिटीसची लक्षणे :
टाईप टू च्या डायबिटीसमध्ये मानसिक स्वास्थ्यावर वाईट परिणाम होऊ शकतो यामुळे पेशंट डिप्रेशन एक्सायटीचा बळी पडू शकतो. मानसिक संतुलन व्यवस्थित ठेवण्यासाठी शरीरात शुगर लेव्हल योग्य प्रमाणात असणे आवश्यक असते. टाईप वन व टाईप टू च्या डायबिटीस मध्ये पेशंट ने खाण्यापिण्यावर नियंत्रण ठेवून विशेष लक्ष दिले पाहिजे. जेवणाची वेळ व जेवणाचे योग्य प्रमाण ठरवून दैनंदिन दिनक्रम ठरवावा.
उपचार पद्धती : डायबिटीसची वेळेवर ओळख करून घ्यावी व त्वरित उपचार सुरू करावेत.
डायबिटीजच्या पेशंटला गोड पदार्थ ऐवजी शुगर फ्री पदार्थ खायला द्यावीत. बाजारात बरीच शुगर फ्री प्रॉडक्ट उपलब्ध असतात. विशेष करून आपण स्वतः आपल्या दिनचर्यांची काळजी घेतली पाहिजे. जेवणात पालेभाज्या मोड आलेले धान्य पनीर तूप अंडी मासे बदाम अक्रोड जवस असे कार्बोहायड्रेट्स कमी असलेले पदार्थ खावे. शक्यतो साखर मैदा पांढरा भात बटाटे असे पदार्थ टाळावे. गोड फळे आंबा चिकू सीताफळ मर्यादित प्रमाणात खावे. रोज वॉकिंग करा. डायट आणि एक्झरसाइज करून डायबिटीस नियंत्रणात आणता येते.




