Health News : तुमच्या जीवनशैलीचा तुमच्या आरोग्यावर थेट परिणाम होतो, म्हणूनच प्रत्येकाला निरोगी दिनचर्या पाळण्याचा सल्ला दिला जातो. सकाळपासून संध्याकाळपर्यंत आपण जाणून-बुजून अशा अनेक गोष्टी करत असतो, ज्याचा आपल्या आरोग्यावर गंभीर परिणाम होतो. आपल्या मानवी शरीरात 70-75% पाणी असतं त्यामुळे अनेक आजारांपासून आपलं संरक्षण होतं.
दररोज भरपूर पाणी प्या असं नेहमीच सांगितलं जातं. किती वेळा आणि कसं पाणी प्यायचं याबद्दलही अनेक गोष्टी सांगितल्या जातात. मात्र तुम्ही दात न घासता पाणी प्यायला आहात का? वाचल्यावर कदाचित काही जणांना शिरशिरी येईल. मात्र सकाळी उठल्यावर दात न घासता तसंच पाणी पिण्याचे अनेक फायदे आहेत. याबद्दल आज आपण जाणून घेऊयात….
सकाळी दात ब्रश करण्याआधी पाणी पिण्याचे एकदा पाहाच….
– पचनसंस्थेचं कार्य राहतं चांगलं
तुम्हाला दररोज सकाळी उठल्यानंतर दात ब्रश करण्याआधी भरपूर पाणी प्यायची सवय असेल, तर तुमच्या पचनसंस्थेशी संबंधित समस्या निर्माण होत नाहीत. यामुळे तुमची पचनसंस्था चांगली राहते.
– प्रतिकारशक्ती वाढण्यास होते मदत
दररोज सकाळी पाणी प्यायल्यामुळे तुमची प्रतिकारशक्ती सूदृढ राहते. तसेच ज्या लोकांना नेहमी सर्दी, ताप यासारख्यी लक्षणे आहेत त्या लोकांनी दररोज सकाळी ब्रश करण्याआधी कोमट पाणी प्यायला हवं.
– केस चमकदार राहतात
दररोज सकाळी दात ब्रश करण्याआधी पाणी प्यायल्यामुळे तुमच्या केसांचं आरोग्यही चांगलं राहण्यास मदत मिळते आणि केस चमकदार होतात.
– उच्च रक्कदाबाच्या समस्येपासून दूर राहण्यास मदत
जे उच्च रक्तदाबाचे रूग्ण आहेत त्यांनी दररोज सकाळी पाणी प्यायची सवय लावून घ्यायला हवं. सकाळी उठल्यानंतर साधं पाणी किंवा कोमट पाणी प्यायला हवं. यामुळे रक्तदाबाची पातळी नियंत्रित राहण्यास मदत मिळते.