मुंबई : समाजवादी पक्षाचे ज्येष्ठ नेते तथा उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री मुलायमसिंह यादव यांचे रुग्णालयात उपचारादरम्यान निधन झाले आहे. ते ८२ वर्षांचे होते. मुलायमसिंह यादव यांचे पुत्र अखिलेश यादव यांनी याबाबत माहिती दिली आहे. मुलायमसिंह यादव यांच्या निधनानंतर देशभरात हळहळ व्यक्त केली जात आहे. खासदार सुप्रिया सुळे यांनीदेखील दु:ख व्यक्त केले आहे.
सुप्रिया सुळे यांनी एक ट्विट करत मुलायम सिंह यांना श्रद्धांजली वाहिली आहे. “ते देशातील सर्वोच्च समाजवादी नेत्यांपैकी एक होते,” असे सुप्रिया सुळे म्हणाल्या आहेत. माजी केंद्रीय संरक्षणमंत्री तथा उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांच्या निधनाचे वृत्त ऐकून दु:ख झाले आहे. नेताजी मुलायमसिंह यादव हे देशातील सर्वोच्च समाजवादी नेत्यांपैकी एक होते, अशा भावना सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केल्या आहेत.
Deeply saddened to hear about the demise of Former Union Defence Minister and Chief Minister of Uttar Pradesh Mulayam Singh Yadav Ji. Netaji was one of the tallest socialist leader our country has seen. pic.twitter.com/nraDdLim5O
— Supriya Sule (@supriya_sule) October 10, 2022
तसेच पुढे बोलताना सुप्रिया सुळे यांनी, “त्यांचा दांडगा लोकसंपर्क होता. संसदेत त्यांचे काम बघण्याची मला संधी मिळाली. प्रत्येक कार्यकर्त्याचे त्यांच्याशी प्रेमाचे नाते होते. आम्ही त्यांना प्रेमाने नेताजी म्हणायचो. ते आले की त्यांच्याभोवती खासदार आमदार जमायचे. ते मनाने शेतकरी होते. ते अतशिय प्रेमळ आणि दिलदार होते. त्यांच्या मनात कधीही कोणाबद्दल आकस नव्हता. त्यांना सोडून गेलेल्या लोकांशीही ते अनेकदा प्रेमाने भेटत, गप्पा करत.” असे म्हटले आहे.