Actress Swara Bhaskar : अभिनेत्री स्वरा भास्कर तिच्या विधानांमुळे सतत चर्चेत असते. तिची काही विधाने वादाच्या भोवऱ्यातही सापडतात. तिने बॅालिवूडमधील अनेक मोठ्या सिनेमांमध्ये काम केले आहे. दाक्षिणात्य अभिनेता धनुष्य आणि अभिनेत्री सोनम कपूर यांची प्रमुख भूमिका असलेल्या राँझमा सिनेमात तिची छोटी भूमिका आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहे. याशिवाय तिने तनु वेड्स मनु, प्रेम रतन धन पायो आणि अनारकली या आणि अशा प्रकारच्या अनेक सिनेमात साकारलेल्या भूमिकेमुळे तिने मोठी प्रसिद्ध मिळवली आहे. कलर्स हिंदी या वाहिनीवरील पती पत्नी और पंगा या शोमुळे अभिनेत्री स्वरा भास्कर पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. तिचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला असून, या व्हिडीओत अभिनेत्रीने तिचा पहिला क्रश कोण होता, त्याचे नाव सांगितले आहे. . लहानपणी अक्षय कुमारचे आणि राहुल द्रविडचे यांचे माझ्या खोलीत भिंतीवर पोस्टर्स लावलेले होते, अशी आठवण अभिनेत्रीने सांगितली. हेही वाचा : tamannaah bhatia: वजन कमी करताना साखर पूर्णपणे बंद करू नका; तमन्ना भाटियाच्या ट्रेनरचा सल्ला, ‘थोडं गोड खा, शरीर आणि मन दोन्ही फिट राहील!’ पुढे ती म्हणाली, ९० च्या दशकात ‘चुरा के दिल मेरा‘ हे गाणे आले, तेव्हा मी १० वर्षांची किंवा त्याहून कमी वयाचा असेन. मी या माणसाला इतक्या उंच उड्या मारताना पाहायचे. व्वा, नंतर मी त्याच्या प्रेमात पडले होते. मला ते गाणं खूप आवडलं. माझा क्रश अक्षय कुमार होता, असे अभिनेत्री स्वरा भास्करने सांगितले. या व्हिडीओत तिला प्रश्न विचारण्यात आला की, ती कधी त्याला भेटली आहे किंवा त्याच्याशी बोलणे झाले आहे का, तेव्हा ती म्हणाली, “नाही, मी त्याच्याशी बोलले नाही, पण आम्ही एका पुरस्कार सोहळ्यात एकत्र आला होता, त्यावेळी मी त्याला शुभेच्छा दिल्या.” पण अजूनही अक्षय कुमार मला आवडतो, असे अभिनेत्री म्हणाली. हेही वाचा : “…भाजपाने स्वतःच्या थोबाडीत मारो आंदोलन केले पाहिजे” ; राज ठाकरेंचा शिलेदार असं का म्हणाला?