त्याने मला किस…; सक्रेड गेम्स फेम अभिनेत्रीने सांगितला कास्टिंग काऊचचा कटू अनुभव, म्हणाली माझं लग्न झालयं हे त्याला….

Actress Surveen Chawla : सध्या चित्रपटसृष्टीतील महिला कलाकार आपल्याला आलेल्या कास्टिंग काऊचे अनुभव शेअर करत आहेत. अशातच अभिनेत्री सुरवीन चावलाला देखील कास्टिंग काऊचा कटू अनुभव आला असल्याचे तिने हॉटरफ्लायला दिलेल्या मुलाखतीत सांगितले. तिचे लग्न माहित असतानाही एका दिग्दर्शकाने तिला किस करण्याचा प्रयत्न केला होता. असा वाईट प्रसंग तिने सांगितला आहे.
मुंबईच्या वीरा देसाई रोडवरची ही गोष्ट आहे. अॅाफिसमध्ये मीटिंग झाल्यानंतर ती व्यक्ती सुरवीन हिला गेटपर्यंत सोडायला गेली. ही घटना आहे सुरवीनचे लग्न झाल्यानंतरची. तिने पुढे सांगितले की मीटिंगमध्ये त्याने मला सगळं कसं चाललयं, पती काय करतात? असे कबिनमध्ये विचारलं होतं. बोलण झाल्यानंतर मी दाराजवळ पोहचले आणि बाय बोलणार तेव्हा तो माझ्याकडे झुकला आणि त्याने मला किस करण्याचा प्रयत्न केला. मग त्याला मी मागे ढकललं. मी घाबरले आणि त्याला विचारले की तू काय करतोय आणि मग मी निघून गेले. असा अत्यंत कटू अनुभव सुरवीने शेअर केला.
View this post on Instagram
सुरवीनने २००३ मध्ये ‘कहीं तो होगा’ या मालिकेतून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. त्यानंतर तिने मालिकाविश्वात आपला जम बसवत विविध मालिकेत अभिनय केला. २००८ मध्ये तिने ‘परमेशा पानवाला’ या कर्नाटक भाषेतील चित्रपटातून चित्रपटसृष्टीत एन्ट्री केली. त्यानंतर तिची पाऊल बॅालीवूड इंडस्ट्रीकडे वळाली. तिने हेट स्टोरी २, पार्च्ड’ आणि ‘छुरी’ यासांरख्या चित्रपटात काम केले. त्यानंतर तिने सक्रेड गेम्स या वेब सीरीजधून ओटीवर पदार्पण केले. नुकतीच तिची क्रिमिनल जस्टिस ४ वेबसिरीज रिलीज झाली असून ’राणा नायडू सीझन २ मध्ये ती दिसणार आहे.
हेही वाचा: Hera Pheri 3. परेश रावल यांच्या एक्सिटवर जॅानी लीव्हरने दिली प्रतिक्रिया; म्हणाला मजा नही आएगा…!





