HDFC Bank : एचडीएफसी बँकेचा मोठा निर्णय ! 16 तास बंद राहणार ‘या’ सेवा

मुंबई : HDFC बँकेच्या ग्राहकांसाठी एक मोठी बातमी समोर आली आहे. जे ग्राहक या बँकेचे App वापरतात किंवा ऑनलाईन सेवा वापरतात त्यांच्यासाठी बँकेकडून एक निवेदन जारी करण्यात आले आहे. बँकेच्या अनेक सेवा 16 तास बंद राहणार आहेत.
कोणत्या सेवा राहणार बंद ?
यामध्ये व्हॉट्सॲपद्वारे चॅट बँकिंग, एसएमएस बँकिंग, टोल फ्री बँकिंग आणि फोन बँकिंग IVR सारख्या सुविधा बंद राहतील. बँकेने ठरवलेल्या दिवशी आणि वेळेवर या सेवा बंद राहणार आहेत.
कधी बंद होणार या सेवा?
या सेवा एकूण 16 तास बंद राहतील. बँकेच्या म्हणण्यानुसार, ही देखभाल 24 जानेवारी रोजी रात्री 10 वाजल्यापासून सुरू होईल आणि 25 जानेवारी रोजी दुपारी 2 वाजता पूर्ण होईल. अशा प्रकारे, या संपूर्ण कालावधीत अनेक बँकिंग सेवा प्रभावित होतील.
का बंद ठेवणार सेवा?
एचडीएफसी बँकेने आपल्या ग्राहकांना याबाबत सूचना दिल्या आहेत. काही महत्त्वाचे सिस्टम मेंटेनन्सच्या कामानिमित्त 16 तास सेवा बंद राहणार आहेत. येत्या काही दिवसांत काही महत्त्वाचे सिस्टम मेंटेनन्सचे काम केले जाणार आहे. बँकिंग अनुभव सुधारता यावा यासाठी ही सुधारणा केली जाणार आहे.
बँकेने ग्राहकांना केले आवाहन
ग्राहकांनी आपली कामे आज करून घ्यावीत. इतकेच नाही तर पैसे काढून ठेवावेत, ज्यामुळे त्यांना अडचणींचा सामना करावा लागणार नाही. शनिवार-रविवार असल्याने ATM मध्ये पैशांचा खडखडाट असतो. त्यामुळे आधीच रक्कम काढली तर अडचण येणार नाही. काही वेळा ऑनलाईन पेमेंट करताना सर्व्हर डाऊन असेल तरी अडचणी येतात त्यामुळे या गोष्टी टाळण्यासाठी बँकेकडून या सूचना देण्यात आल्या आहेत.





