शाहरुखच्या लेकीचा अंदाज पाहिलात का ? सुहानाचा एअरपोर्टवरील video viral

मुंबई – बॉलिवूडमधील स्टार किड्सबाबत सर्वसामान्यांना नेहमीच उत्सुकता असते. स्टार किड्सला कोणत्या गोष्टी आवडतात कोणत्या गोष्टी आवडत नाहीत हे जाणून घेण्याची सर्वांनाच उत्सुकता असते. यामुळे तैमूर पासून ते आराध्यापर्यंत सर्वच स्टार किड्स चर्चेत असतात. अशाच एका स्टारच्या मुलीचा व्हिडीओ सध्या समोर आला आहे.या व्हिडिओमध्ये केवळ स्टारची मुलगी असल्यामुळे तिला कित्येक जण फॉलो करत असल्याचे दिसते. ही मुलगी दुसरी तिसरी कोणी नसून शाहरुख खानची मुलगी सुहाना आहे.
शाहरुखची मुलगी सुहाना प्रसिद्धी झोतापासून लांब असते. सिनेसृष्टीशी तिचा संबंध केवळ शाहरुखची मुलगी असल्यामुळेच आहे. परंतु समोर आलेल्या व्हिडिओमध्ये तीची क्रेझ एखाद्या अभिनेत्रींप्रमाणे असलयाचे दिसत आहे. या व्हिडिओमध्ये ती विमानतळावर उतरलेली दिसते आणि एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी चालत जाणयासाठी निघते. एखाद्या सेलिब्रेटीप्रमाणे तिचा वावर असल्यामुळे अनेक जण यावेळी अचंबित होताना व्हिडीओमध्ये दिसून येतात
सुहाना खान लवकरच ‘द आर्चीज’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार असल्याच्या चर्चा सुरु आहेत. या चित्रपटात तिच्यासोबत अगस्त्य नंदा आणि खुशी कपूर यांच्याही महत्त्वाच्या भूमिका असल्याचे समोर आले होते. हा चित्रपट जोया अख्तर दिग्दर्शित करणार आहे.सुहानाची क्रेझ पाहता तिच्या चाहत्यांना चित्रपटाची उत्सुकता लागली आहे.

