अद्भुत अनुभव होता, कायम स्मरणात राहिल – अल्झारी जोसेफ

हैदराबाद: आयपीएलच्या बाराव्या मोसमातील गोलंदाजांमध्ये सर्वोत्कृष्ठ कामगिरी करणाऱ्या अल्झारी जोसेफने त्याच्या कामगिरील अद्भुत आणि कायम स्मरणात राहाणारी कामगिरी असे संबोधले आहे.

सनरायजर्स हैदराबाद विरुद्ध मुंबई इंडियन्स दरम्यान झालेल्या सामन्यात सनरायजर्स हैदराबादला मुंबईच्या संघाने केवळ 96 धावांमध्येच बाद करत 40 धावांनी विजय संपादन केला. या सामन्यात अल्झारी जोसेफने केवळ 12 धावा देत हैदराबादच्या 6 फलंदाजांना तंबुचा रस्ता दाखवला. यावेळी त्याने ज्या सहा जनांना बाद केले. त्यात, डेव्हिड वॉर्नर, विजय शंकर, दीपक हूडा, रशिद खान, भुवनेश्‍वर कुमार आणि सिद्धार्थ कौल यांचा समावेश होता. यातील तीन फलंदाज दोन अष्टपैलू तर एक गोलंदाज होता. त्यामुळे त्याच्या कामगिरीला विशेष महत्व प्राप्त झाले आहे.
यावेळी बोलताना जोसेफ म्हणाला की, हे खरच अविश्‍वसनिय आहे. एखाद्या स्पर्धेतील तुम्ही पहिला सामना खेळत आहात आणि त्या सामन्यात तुमच्या कऍडून अशाप्रकारची कामगिरी होते. हे खरच अद्भुत आहे. सध्या मी त्याचा खुप आनंद घेत असून आगामी कालात अशाच कामगिरीची पुनरावृत्ती व्हावी यासाठी मी प्रयत्नशील राहाणार आहे. असेही त्याने यावेळी सांगितले.

यावेळी त्याला त्याच्या पदार्पनाच्या सामन्यामध्ये तु गोलंदाजीला येण्यापुर्वी काय विचार केला होता. असे विचारले असता तो म्हणाला की, या सामन्यात आमच्या संघाची सुरूवात खराब झाली होती. मात्र, आम्ही चांगली गोलंदाजी करुन सामना जिंकू शकतो यावर मला विश्‍वास होता. त्यामुळे आम्ही स्टम्प टू स्टम्प गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्याचाच आम्हाला यावेळी फायदा झाला असेही त्याने यावेळी सांगितले.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.