हाथरस – हाथरसमधील पीडितेवर कथित बलात्कार करणाऱ्याचे शीर आणून देणाऱ्यास एक कोटी रुपयांचे इनाम बुलंदेश्वरमधील कॉंग्रेस नेते निझाम मलिक यांनी जाहीर केले. त्यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांना पोलिसांनी तातडीने अटक केली.
हाथरस येथील पीडितेच्या कुटुंबीयांना भेटण्यासाठी राहुल आणि प्रियांका गांधी जात असताना पोलिसांनी त्यांना काही काळ अडवले होते. त्यावेळी जमा झालेल्या कार्यकर्त्यांना पांगवण्यसाठी पोलिसांनी लाठीमार केला होता. त्यात मलिक जखमी झाले होते.
आरोपी निर्दोष : सवर्ण पंचायत
दरम्यान, ही घटना घडलेल्या बुलघरी गावापासून दोन किमी अंतरावरील बघना गावात ठाकूर आणि ब्राह्मण या सवर्ण जातींनी शनिवारी महापंचायत आमंत्रित केली. त्यात आरोप असणारे चारही जण निर्दोष असल्याचे सांगण्यात आले.
या प्रकरणाच्या सीबीआय चौकशीची मागणी केली. अशीच परिषद रविवारी सकाळी घेण्यात आली. त्यात निर्दोष तरुणांना यात गुंतवण्यात आले आहे. पीडितेच्या कुटुंबीयांच्या कॉल रेकॉर्ड काढून सखोल चौकशी करण्याची मागणी केली.