मुंबई – भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आणि राज्याचे ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ व त्यांच्या कुटुंबीयांनी 127 कोटी रुपयाांचा घोटाळा केला असल्याचा आरोप केला आहे व त्यांनी 2700 पानी पुरावे असल्याचे सुधा सांगितले आहे. यावर मुश्रीफ यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. हसन मुश्रीफ यांनी किरीट सोमय्या यांच्या विरोधात अब्रुनुकसानीचा दावा टाकणार असल्याचे सांगितले आहे. सोबत भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या विरोधात सुद्धा अब्रुनुकसानी दाव करण्यार असल्याचे ते बोलले आहेत. हसन मुश्रीफ म्हणाले की, ”मी आतापर्यंत ५०-५० कोटींचे अब्रुनुकसानीचे सहा दावे दाखल केले आहेत. आता सातवा दावा दाखल करणार आहे. माझ्या कुटुंबाची आणि माझी बदनामी झाली. गेल्या १७ वर्षांपासून मी राजकारणात आहेत. माझ्यावर कोणी आरोप केला. भाजपसारखे चिक्की घोटाळे आम्ही केले नाही. येत्या दोन आठवड्यात फौजदारी अब्रुनुकसानीची १०० कोटींचा दावा कोल्हापूरच्या सत्र न्यायालयात करत आहे.” अनेक दिवस सगळ्यांना मी सांगत होतो माझ्या पक्षाच्या विरोधात माझ्या विरोधात बदनामीच सुरू आहे. सोमय्यांनी १२७ कोटी घोटाळ्याचा आरोप केला. त्याचा मी निषेध करतो. त्यांनी जे कागदपत्रे दाखविली ते सर्व संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. निवडणुकीमध्ये कागदपत्रे आपण दाखल करतो ते उपलब्ध असतात. विशेष यांनी असे काही केले नाही.’ असे मुश्रीफ म्हणाले आहेत. विधानसभेच्या निवडणुकीपूर्वी माझ्या घरावर धाड टाकली होती. सर्व निवासस्थानावर धाड टाकली. त्यात काहीच आढळले नाही. कारखान्यामध्ये त्यांना काही संशय होता. ते प्रकरण आता न्याप्रविष्ट आहे. अडीच वर्ष धाड टाकून झाली. त्यात अजून काहीच कारवाई झाली. त्याबाबत मी सर्व उत्तरे दिलेली आहेत. असेही म्हणाले. किरीट सोमय्या यांनी नेमके कोणते आरोप केले ? ठाकरे सरकारच्या 11 लोकांची नावे मी घेतली होती मात्र दुर्दैवाने या यादीत वाढ झाली आहे. यामध्ये मंत्री हसन मुश्रीफ यांचे नाव वाढले असून त्यांनी हजारो कोटींचे घोटाळे केले आहेत. यासंदर्भात 2700 पानी पुरावे माझ्याकडे आहेत. हसन मुश्रीफ आणि त्यांच्या कुटुंबीयांनी 127 कोटींचा घोटाळा केला असून हसन मुश्रीफ यांच्या पत्नीचे शेअर सर सेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्यात आहेत. तसेच संताजी घोरपडे साखर कारखान्यात 100 कोटींचा घोटाळा केला आहे. असे आरोप त्यांनी लावले आहेत. “CRM Systems PVT LTD इथे प्रविण अगरवाल ऑपरेट करतात. या कंपनीतून हसन मुश्रीफ यांचे सुपुत्र नाविद मुश्रीफ यांनी दोन कोटींचं लोन घेतल्याचं दाखवलंयय. या कंपनीवर २०१७-१८मध्ये प्रतिबंध आला होता. त्या कंपनीतून ज्यांनी एंट्री घेतली, त्यांच्यावर कारवाई सुरू झाली आहे. त्याच कंपनीतून नाविद मुश्रीफ यांनीही निवडणुकीसाठी फॉर्म भरला होता. त्यांच्या निवडणूक प्रतिज्ञापत्रात दाखवलंय की सीआरएम कंपनीत २ कोटी ४५ लाख ३५४ एवढी रक्कम दाखवली आहे. सीआरएम ही शेल कंपनी असल्याचं सिद्ध झालं आहे” असा दावा सुद्धा सोमय्या यांनी केला आहे.