चंदीगढ: हरियाणातील लाखो सरकारी कर्मचारी आणि निवृत्ती वेतनधारकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. राज्य सरकारने शुक्रवारी महागाई भत्ता (Dearness Allowance – DA) आणि महागाई दिलासा (Dearness Relief – DR) दरांमध्ये वाढ करण्याची घोषणा केली आहे. या निर्णयामुळे राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनात आणि निवृत्ती वेतनधारकांच्या मूळ निवृत्ती वेतनात मोठी वाढ होणार आहे. किती झाली वाढ? या वाढीनंतर, आता कर्मचारी आणि निवृत्ती वेतनधारकांना त्यांच्या मूळ वेतनावर/निवृत्ती वेतनावर ५८ टक्के DA आणि DR मिळणार आहे. यापूर्वी हा दर ५५ टक्के होता. म्हणजेच, यामध्ये ३ टक्क्यांची वाढ करण्यात आली आहे. कधीपासून लागू? -हा वाढलेला दर १ जुलै २०२५ पासून लागू होईल. -हा निर्णय सातव्या वेतन आयोगांतर्गत (7th Pay Commission) वेतन आणि निवृत्ती वेतन घेणाऱ्यांवर लागू होईल. कधी मिळणार वाढीव वेतन आणि थकबाकी (Arrears)? -वाढीव DA आणि DR सह वेतन आणि निवृत्ती वेतन ऑक्टोबर २०२५ च्या वेतनासोबत/निवृत्ती वेतनासोबत दिले जाईल. -जुलै ते सप्टेंबर २०२५ या तीन महिन्यांची थकबाकी (Arrears) नोव्हेंबर २०२५ मध्ये दिली जाणार आहे. -मुख्य सचिव आणि अतिरिक्त मुख्य सचिव (वित्त विभाग) अनुराग रस्तोगी यांनी याबाबतचा लेखी आदेश जारी केला आहे. महागाईच्या काळात सरकारने घेतलेल्या या निर्णयामुळे कर्मचारी आणि निवृत्ती वेतनधारकांना मोठा दिलासा मिळाला असून, कर्मचारी संघटनांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे.