हरियाणा निवडणुकीतून भाजपकडून बबिता फोगटचा पत्ता कट ; नेमकं काय आहे कारण?, वाचा सविस्तर

Haryana Assembly Elections । हरियाणा विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने आपली पहिली यादी जाहीर केलीय. पक्षाने पहिल्या यादीत 67 उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत. यावेळी भाजपने कुस्तीपटू बबिता फोगटचे तिकीट कापले असून चरखी-दादरी मतदारसंघातून सुनील सांगवान यांना तिकीट दिले आहे. सुनील सांगवान यांनी तीन दिवसांपूर्वीच कारागृह अधीक्षक पदावरून व्हीआरएस घेतला होता.
भाजपच्या उमेदवारांची यादी बाहेर आल्यानंतर बबिता फोगट यांनी महिला कुस्तीपटूंच्या आंदोलनादरम्यान भाजप आणि सरकारला उघडपणे पाठिंबा दिल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. अशा स्थितीत बबिता फोगट यांनी चरखी-दादरीमधून निवडणूक लढवली तर जिंकता येणार नाही, असे भाजपला वाटत आहे. त्यामुळे भाजपने सुनील सांगवान यांना संधी दिली.
उमेदवारांची यादी येण्यापूर्वी बबिता फोगट यांनी चरखी-दादरी मतदारसंघावर आपला राजकीय प्रचार तीव्र केला होता आणि त्या परिसरात सतत सक्रिय होत्या. अशा परिस्थितीत ते पुन्हा एकदा तिकिटाच्या शोधात असल्याचे दिसत होते, मात्र सुनील सांगवान यांच्या एंट्रीने त्यांचा राजकीय खेळ बिघडला.
बबिताच्या जागी सुनील सांगवानला संधी Haryana Assembly Elections ।
सुनील सांगवान यांचे वडील सतपाल सांगवान हरियाणात कॅबिनेट मंत्री राहिले आहेत. दादरीतून त्यांनी सहा वेळा निवडणूक लढवली आहे. सुमारे 28 वर्षांच्या राजकारणात सांगवान यांनी सलग सहा निवडणुका लढवल्या, अन् दोनदा विजयी होऊन मंत्रीही झाले. माजी मुख्यमंत्री स्व. बन्सीलाल यांनी त्यांना राजकारणात आणले होते.
आता गेल्या रविवारी सुनील सांगवान यांनी कारागृह अधीक्षक पदावरून व्हीआरएस घेण्याचे पत्र सरकारला लिहिले आणि त्यानंतर सरकारने त्यांना तातडीने सेवानिवृत्त केले. सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे सुनील सांगवान यांनी त्यांच्या कार्यकाळात बलात्कार आणि हत्या प्रकरणात दोषी ठरलेल्या डेरा मुखी राम रहीमला पॅरोल आणि फर्लो दिला होता.
2019 ची आकडेवारी Haryana Assembly Elections ।
2019 च्या निवडणुकीत कुस्तीपटू बबिता फोगटने भाजपच्या तिकिटावर राजकारणात प्रवेश केला होता. यानंतर तिने चरखी-दादरी विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली, पण त्यांना विजय मिळवता आला नाही. चरखी-दादरी मतदारसंघातून 2019 मध्ये अपक्ष सोंबीर सांगवान आमदार म्हणून निवडून आले होते.
सतपाल सांगवान यांनी जेजेपीच्या तिकिटावर निवडणूक लढवली, त्यांना 29577 मते मिळाली आणि ते दुसऱ्या क्रमांकावर होते. भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढवलेल्या बबिता फोगट यांना 24 हजार 786 मते मिळाली आणि तिसऱ्या स्थानावर आहेत.





