हरियाणात होणार काँग्रेस-सपा यांच्यात युती? ; दीपेंद्र हुड्डा यांची भाजपवर टीका , म्हणाले, “त्यांनी १० वर्षांत…”

Haryana Assembly Election । हरियाणामध्ये आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. त्यातच आता काँग्रेसची ‘हरियाणा मांगे हिसाब’ यात्रा काल हिसारच्या हंसी गावात पोहोचली. या यात्रेचे नेतृत्व लोकसभा खासदार दीपेंद्र सिंह हुड्डा यांनी केले. यात्रेत सहभागी झालेल्या कार्यकर्त्यांचाही उत्साह होता. या रोड शोमध्ये दीपेंद्र सिंह हुड्डा यांनी भाजपवर जोरदार हल्ला चढवला आहे. भाजपने गेल्या 10 वर्षात हरियाणातील जनतेचा विश्वासघात केला आहे, अशी टीका त्यांनी केली.
भाजपने १० वर्षात राज्यातील जनतेचा विश्वासघात केला
काँग्रेसचे खासदार दीपेंद्र हुड्डा या यात्रेत दरम्यान भाजपवर सडकून टीका केली. त्यांनी, “भाजपने गेल्या 10 वर्षात हरियाणातील जनतेचा विश्वासघात केला आहे. मला वाटते की काँग्रेस पक्ष हरियाणात प्रचंड बहुमताने सरकार स्थापन करेल. लोकांनी आपले मत बनवले आहे. समाजवादी पक्षाला येथे कोणताही पाठिंबा नाही. हरियाणामध्ये राष्ट्रीय पातळीवर आमची युती आहे, परंतु आज आमची राज्य पातळीवर समाजवादी पक्षाशी युती नाही.
#WATCH | Hisar, Haryana: Congress MP Deepender Hooda says, “…BJP has betrayed the people of Haryana in the last 10 years. I think the Congress party will form the government in Haryana with a huge majority. People have made up their minds…Samajwadi Party has no mass base in… https://t.co/NGwIdjCc9d pic.twitter.com/d8LMHPLUmE
— ANI (@ANI) July 19, 2024
भाजप-काँग्रेस आमने-सामने Haryana Assembly Election ।
खरेतर, हरियाणात काँग्रेसने चालवलेल्या ‘हरियाणा मांगे हिसाब’ आणि भाजपने सुरू केलेल्या ‘हुड्डा दे जवाब’ मोहिमेवरून दोन्ही राजकीय पक्षांमध्ये मतभेद आहेत. हरियाणा काँग्रेस कमिटीने सत्ताधारी भाजपला त्यांच्या 10 वर्षांच्या कार्यकाळाचा हिशेब मागितला आहे. त्याचबरोबर माजी मुख्यमंत्री भूपेंद्र सिंह हुड्डा यांनी त्यांच्या 10 वर्षांच्या कार्यकाळात केलेल्या कामांवर भाजपने प्रश्न विचारले आहेत.
या मोहिमेअंतर्गत दीपेंद्र हुडा राज्यभर पदयात्रा काढून लोकांशी संवाद साधत आहेत. 20 ऑगस्टनंतर भूपेंद्र सिंह हुड्डा संपूर्ण राज्यात रथयात्रा काढणार आहेत. पदयात्रेदरम्यान दीपेंद्र एका दिवसात दोन विधानसभा मतदारसंघ कव्हर करत आहेत. सर्व 90 विधानसभा मतदारसंघात पदयात्रा काढण्याची त्यांची योजना आहे.





