Harshwardhan Sapkal : फडणवीस केंद्रात चांगला कंट्रोल ठेवतील; हर्षवर्धन सपकाळ यांची खोचक टीका
केसाने गळा कापण्याचे कौशल्य देवेंद्र फडणवीस यांच्यात असल्याने ते केंद्रात गेल्यास धर्मेंद्र प्रधान यांच्यापेक्षाही चांगले कंट्रोल केंद्रात करू शकतील, असा खोचक टोला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ (Harshwardhan Sapkal) यांनी लावला आहे.

Harshwardhan Sapkal : केसाने गळा कापण्याचे कौशल्य देवेंद्र फडणवीस यांच्यात असल्याने ते केंद्रात गेल्यास धर्मेंद्र प्रधान यांच्यापेक्षाही चांगले कंट्रोल केंद्रात करू शकतील, असा खोचक टोला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ (Harshwardhan Sapkal) यांनी लावला आहे.
सपकाळ (Harshwardhan Sapkal) म्हणाले, आगामी काळात एक घटना अशी होईल की, देशाचे राजकारण पूर्णतः बदलून जाईल. 2029 नंतर नरेंद्र मोदी राष्ट्रपती होतील आणि अमित शहा पंतप्रधान होतील, असे वातावरण सध्या निर्माण केले जात आहे.
प्रधानांच्या राजीनाम्याची मागणीची भीमगर्जना लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधींनी सर्वात आधी केली होती. दरम्यान, देशात झालेल्या आंदोलनामुळे सरकारचा अहंकार हा झुकला आहे. मात्र यामुळे जागतिक स्तरावर देशाची प्रतिमा मलिन झाल्याची टीकाही त्यांनी केली.
नैतिकतेने राजीनामा देण्याची पद्धत लाल बहादूर शास्त्री यांनी सुरू केली. मात्र मोदी आल्यापासून हेकेखोरशाही सुरू झाली आहे. आम्ही म्हणजे ईश्वर आहोत, असा भ्रम मोदी सरकारचा होता. प्रधानांनी जर राजीनामा दिला तर पेपरफुटीचे रॅकेट जनतेला कळेल, अशी भीती सरकारच्या मनात होती असा आरोपही त्यांनी केला. दैवतीकरण करणे हा भाजपचा अजेंडा आहे. सामुदायिक नेतृत्वाने आपण पुढे गेलो पाहिजे. विद्यार्थ्यांना आता यश मिळाले, असेही सपकाळ (Harshwardhan Sapkal) म्हणाले.
टोलकरी गडकरी राजीनामा झाला पाहिजे
प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर आता टोलकरी गडकरी यांचा राजीनामा झाला पाहिजे, असे सपकाळ यांनी म्हटले. इथेनॉलयुक्त डिझेल आणि पेट्रोल देत सर्वसामान्यांच्या वाहनांमध्ये एका बाजूला वाट लावली. दुसरीकडे इथेनॉल निर्माण करणाऱ्या कंपनीने वारेमाप पैसा कमावलेला आहे.
एकीकडे हा भ्रष्टाचार आहे, तर दुसरीकडे नागरिकांना छळणे सुरू आहे. त्यामुळे या देशामध्ये एक मोठा स्कँडल हे इथेनॉलच्या अनुषंगाने झालेले आहे. त्यामुळे मोदींनी देशातील जनतेची माफी मागावी व गडकरींनी तात्काळ राजीनामा द्यावा, अशी मागणी त्यांनी (Harshwardhan Sapkal) केली.






