बिजवडी -कर्मयोगी शंकररावजी पाटील सहकारी साखर कारखाना कार्यस्थळावर शुक्रवार (दि.21) माजी सहकार व संसदीय कार्यमंत्री तथा कारखान्याचे चेअरमन हर्षवर्धन पाटील यांच्या 57 व्या वाढदिवसानिमित्त अभिष्टचिंतन समारंभ पार पडला. प्रारंभी कर्मयोगी भाऊ यांच्या प्रतिमेस अभिवादन करण्यात आले. कारखान्याचे सर्व संचालक यांच्या हस्ते केक कापण्यात आला. कार्यकारी संचालक बाजीराव सुतार यांनी हर्षवर्धन पाटील यांच्या कार्याचा आढावा घेतला. पद्माताई भोसले यांचे मार्गदर्शन, तसेच सर्व संचालकांना घेऊन कारखान्यांची वाटचाल यशस्वी सुरू आहे. यावेळी रक्तदान शिबिरात 101 बाटल्यांचे संकलन करण्वात आले. कर्मयोगी कारखान्यावर हर्षवर्धन पाटील, पद्माताई भोसले यांच्या संकल्पनेतून नुकतेच 6000 दिर्घायुषी झाडांचे लागवड करण्यवात आली होती. कार्यकारी संचालक बाजीराव सुतार यांनी प्रास्ताविक केले. समारोप संचालक अंबादास शिंगाडे यांनी केले. यावेळी संचालक राजेंद्र गायकवाड, भास्कर गुरगुडे, सुभाष काळे, मच्छिंद्र अभंग, प्रशांत सूर्यवंशी, मानसिंग जगताप, यशवंत वाघ, अंबादास शिंगाडे, सरपंच देशमुख, उपस्थित होते.