पुणे जिल्हा | हर्षवर्धन पाटील आज राष्ट्रवादीत प्रवेश करणार

इंदापूर, (प्रतिनिधी)- राज्याचे माजी सहकार व संसदीय कार्यमंत्री हर्षवर्धन पाटील हे सोमवारी (दि. 7) राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षात प्रवेश करणार असल्याची माहिती इंदापूर तालुका अध्यक्ष अॅड. तेजसिंह पाटील यांनी दिली.
इंदापूर येथील शासकीय विश्रामगृह येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना अॅड. तेजसिंह पाटील म्हणाले, इंदापूर शहरातील जुन्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रांगणात होणार्या मेळाव्यात हर्षवर्धन पाटील हे आपल्या शेकडो कार्यकर्त्यांसह पक्षात प्रवेश करणारा असून यावेळी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार शरद पवार, पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, खासदार सुप्रिया सुळे, डॉ. अमोल कोल्हे,
आमदार रोहित पवार यांच्यासह अन्य मान्यवरांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश कार्यक्रम होणार आहे. या पत्रकार परिषदेस पक्षाचे कार्याध्यक्ष महारुद्र पाटील, अमोल भिसे, सागर मिसाळ, अशोक घोगरे, छायाताई पडसळकर, इनायत काझी, रेश्मा शेख, संजय शिंदे, सिकंदर बागवान, अक्षय कोकाटे यांचेसह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर बोलताना अॅड. पाटील म्हणाले, आमचे नेते हे शरद पवार व खासदार सुप्रिया सुळे असून इंदापूर विधानसभेला ते जो उमेदवार देतील त्यांचे काम आम्ही करू.





