हर्षवर्धन पाटील सामाजिक नेते 

रेडा – हर्षवर्धन पाटील हे सामाजिक नेते असून सर्व समाजाला घेऊन पुढे जाणारे नेते आहेत. या कारणाने त्यांना जास्तीत जास्त मतदान करून निवडून आणावे, असे आवाहन आरपीआय (आठवले गट) चे जिल्हाध्यक्ष तथा लोणावळ्याचे माजी नगराध्यक्ष सूर्यकांत वाघमारे यांनी केले.

इंदापूर विधानसभा मतदारसंघाचे महायुतीचे भाजपचे उमेदवार हर्षवर्धन पाटील यांच्या प्रचारार्थ वायसेवाडी येथील सभेत वाघमारे बोलत होते. याप्रसंगी तालुकाध्यक्ष संदिपान कडवळे, सुप्रिया वाघमारे, बाळासाहेब सरवदे, विक्रम शेलार, नितीन झेंडे, नितीन घाडगे, सविता कांबळे, दत्तात्रय पवार उपस्थित होते. दरम्यान, माजी संसदीय व सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी उपस्थित सर्व कार्यकर्त्यांचे स्वागत केले.

सूर्यकांत वाघमारे म्हणाले की, आजपर्यंत हर्षवर्धन पाटील यांनी दुजाभाव केला नाही. आरपीआय पुणे जिल्ह्यातच नव्हे तर राज्यात सर्वत्र चांगली चालणारी संघटना आहे. सर्व आरपीआय (आठवले गट) कार्यकर्त्यांनी भाजपला साथ देवून हर्षवर्धन पाटील यांना विकासासाठी विजयी करावे, असे आवाहन त्यांनी केले. यावेळी मारुतीराव वणवे, रमेश जाधव, संपत बंडगर, यशवंत वाघ, हनुमंत काजळे, पिंपरी-चिंचवडचे नगरसेवक केशव घोळवे, नितीन गोफणे, शामराव परकाळे, प्रवीण सलगर उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.