Harshvardhan Patil – जागतिक स्पर्धेच्या युगात केवळ पदवी नव्हे, तर कौशल्य हेच यशाचे खरे भांडवल ठरत आहे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी नवनवीन कौशल्य आत्मसात करून स्वतःला सक्षम बनवले पाहिजे, असे प्रतिपादन माजी मंत्री तथा राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील यांनी केले. इंदापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाच्या कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयाचा वार्षिक पारितोषिक वितरण सोहळा शाहीर अमर शेख सभागृहात उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. यावेळी ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते. कार्यक्रमास पिंपरी-चिंचवड विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. संतोष सोनवणे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. हर्षवर्धन पाटील म्हणाले, “नवीन शैक्षणिक धोरणामुळे शिक्षण क्षेत्रात आमूलाग्र बदल घडत आहेत. विद्यार्थ्यांनी पारंपरिक शिक्षणाबरोबरच विविध भाषा, आधुनिक तंत्रज्ञान आणि संशोधनाची दृष्टी जोपासली पाहिजे. कुलगुरू डॉ. सोनवणे यांनी सांगितले, आजच्या युगात विद्यार्थ्यांसाठी मोठ्या संधी उपलब्ध आहेत. इंदापूर : येथील कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयाच्या वार्षिक पारितोषिक वितरण सोहळ्याचे उद्घाटन माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या अपेक्षा ध्यानात घेऊन कौशल्यधिष्ठित शिक्षण घेणे आवश्यक आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) ही भीती नसून विद्यार्थ्यांसाठी मोठी संधी आहे. योग्य दिशेने प्रयत्न केल्यास जागतिक पातळीवर करिअर घडविता येते. यावेळी शैक्षणिक, क्रीडा, सांस्कृतिक व विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांचा तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला. कार्यक्रमास संस्थेचे सचिव ॲड. मनोहर चौधरी, संचालक विलासराव वाघमोडे, तुकाराम जाधव, सुरेश मेहेर, पराग जाधव, इंदापूर अर्बन बँकेचे संचालक मच्छिंद्र शेटे, निराभिमा सहकारी साखर कारखान्याचे संचालक राजकुमार जाधव आदी उपस्थित होते. प्राचार्य डॉ. जीवन सरवदे यांनी प्रमुख पाहुण्यांचे स्वागत केले. उपप्राचार्य प्रा. दत्तात्रय गोळे यांनी प्रास्ताविक केले. पुरस्कार वितरणाचे वाचन डॉ. भरत भुजबळ, डॉ. सदाशिव उबंरदंड, डॉ. राजाराम गावडे, डॉ. बाळासाहेब काळे व प्रा. बापू घोगरे यांनी केले. प्राध्यापिका स्वाती राऊत यांनी विद्यापीठ व महाविद्यालय गीत सादर केले. सूत्रसंचालन प्रा. रोहिदास भांगे यांनी केले, तर विज्ञान विभाग प्रमुख डॉ. शिवाजी वीर यांनी आभार मानले.