Hardik Pandya likely to miss the crucial RCB clash : आयपीएल २०२६ चा हंगाम पाच वेळा चॅम्पियन राहिलेल्या मुंबई इंडियन्ससाठी एखाद्या वाईट स्वप्नासारखा ठरला आहे. यंदा १० सामन्यांमधील ३ विजयांच्या जोरावर मुंबईचा संघ अजूनही प्लेऑफ्सच्या शर्यतीत टिकून आहे. मुंबईचा पुढील सामना आरसीबीविरुद्ध १९ मे रोजी रायपूरच्या आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर होणार आहे. या महत्त्वपूर्ण सामन्यात कर्णधार हार्दिक पंड्याचे खेळणे जवळपास अनिश्चित मानले जात असून, त्याच्या अनुपस्थितीत सूर्यकुमार यादव पुन्हा एकदा कर्णधारपदाची धुरा सांभाळताना दिसू शकतो. हार्दिक पंड्या रायपूरला रवाना नाही – क्रिकबजच्या वृत्तानुसार, जेव्हा मुंबई इंडियन्सचा संघ मुंबई विमानतळावरून रायपूरसाठी रवाना होत होता, तेव्हा कर्णधार हार्दिक पंड्या संघामध्ये उपस्थित नव्हता. तो सामन्यापूर्वी संघाशी जोडला जाईल किंवा नाही, याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. याआधी वानखेडे स्टेडियमवर लखनौ सुपरजायंट्सविरुद्ध झालेल्या सामन्यातही हार्दिक खेळला नव्हता. पाठीच्या स्नायूंमध्ये आलेली आखूडपणा (बॅक स्पाझम) ही त्याच्या न खेळण्यामागची मुख्य कारणे सांगण्यात आली होती. फलंदाजी आणि गोलंदाजीत निराशाजनक कामगिरी – 🚨BIG UPDATE UPDATE ON HARDIK PANDYA🚨 Ryan Rickelton said🗣️, “Hardik miss match due to back Spasm & team is unsure about the severity and return timeline, but hopes for a quick comeback.” pic.twitter.com/mEoy0ay8lq — Pranay. (@PranayS45) May 5, 2026 आयपीएल २०२६ चा हंगाम खेळाडू आणि कर्णधार या दोन्ही आघाड्यांवर हार्दिकसाठी अत्यंत निराशाजनक ठरला आहे. त्याने ८ सामन्यांत केवळ १४६ धावा केल्या असून, त्याचा स्ट्राईक रेट १३६.४५ इतका राहिला आहे. गोलंदाजीतही त्याला केवळ ४ विकेट्सच मिळवता आल्या आहेत. हेही वाचा – IPL 2026 Playoffs Schedule : आयपीएल २०२६ च्या प्लेऑफ्सचे वेळापत्रक जाहीर! फायनल सामन्याचे ठिकाण बदलले; आता ‘या’ शहरात होणार मुंबई इंडियन्सच्या कर्णधारपदाच्या कारकिर्दीचा विचार करता, हार्दिकच्या नेतृत्वाखाली संघाने आतापर्यंत ३७ सामने खेळले आहेत. यात मुंबईला केवळ १४ सामन्यांत विजय मिळाला असून, २३ सामन्यांत पराभवाचा सामना करावा लागला आहे. अशा स्थितीत जर हार्दिक आरसीबीविरुद्धच्या सामन्याला मुकला, तर त्याच्या कर्णधारपदावर आणि भविष्याबाबत अनेक मोठे प्रश्नचिन्ह निर्माण होणार आहेत.