आज भारत विरद्ध पाकिस्तान यांच्यात सामना खेळवला जात आहे. हा सामना दुबईच्या आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळवला जात आहे. या सामन्याकडे फक्त भारत आणि पाकिस्तानच नाहीतर संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे. या सामन्यात भारताचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्याच्या नावावर एक मोठा विक्रम झाला आहे. हार्दिकने रचला विक्रम अष्टपैलू हार्दिक पांड्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेट करिअरमध्ये 200 विकेटचा पल्ला गाठला आहे. पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात दुसरी विकेट घेताच त्याच्या नावावर हा विक्रम रचला गेला आहे. सउद शकीलला 62 धावांवर बाद केलं आणि तोच त्याचा 200 वा विकेट ठरला. हार्दिक पांड्याने 2016 मध्ये आंतरराष्ट्रीय वनडे क्रिकेट कारकिर्दिला सुरुवात केली होती. त्याने वनडेच्या 85 डावात 89 विकेट घेतल्या. तसेच 11 कसोटीत 17 विकेट, तर टी20 102 डावात 94 विकेट घेतल्या. पाकिस्तान विरुद्ध केला ‘हा’ कारनामा आयसीसीच्या मर्यादित षटकांच्या स्पर्धेत टीम इंडियाकडून एका संघाविरुद्ध सर्वाधिक विकेट घेण्याचा विक्रम हार्दिक पंड्याच्या नावावर झाला आहे. पांड्याने आयसीसी स्पर्धेत पाकिस्तानविरुद्ध 14 विकेट घेतल्या आहेत. शमीने न्यूझीलंडविरुद्ध 12, तर रवींद्र जडेजाने वेस्ट इंडिजविरुद्ध 11 विकेट घेतल्या आहेत.