चारधाम यात्रा लवकरच सुरु ; यात्रेवरील स्थगिती उठवली

डेहराडून – हिंदू धर्मातील लोकांचे श्रद्धा स्थान असलेल्या देव भूमी म्हणजेच चार धाम यात्रा लवकरच सुरु होणार आहे. त्याबद्दलचे आदेश संबंधित प्रशासनाला देण्यात आलेले आहेत. कोविडच्या नियमांचे पालन करत न्यायालयाने चारधाम यात्रा सुरू करण्याचे आदेश दिले. कोरोना संसर्गामुळे उत्तराखंडमध्ये स्थगित चार धाम यात्रेवरील बंदी उच्च न्यायालयाने उठवली आहे.
गुरुवारी, उच्च न्यायालयात झालेल्या सुनावणीदरम्यान, उच्च न्यायालयाने यात्रा बंदीचा २८ जूनचा निर्णय मागे घेतला आहे. कोविडच्या नियमांचे पालन करत न्यायालयाने चारधाम यात्रा सुरू करण्याचे आदेश दिले आहेत. सरकारच्या तर्फे वकील म्हणाले की, सध्या कोरोनाचा संसर्ग नियंत्रणात आहे, त्यामुळे बंदीचा निर्णय मागे घेतला पाहिजे, सरकार यात्रेबाबत नवीन नियमावली तयार करेल.
निकाल देताना न्यायालयाने म्हंटले की केदारनाथ धाममध्ये ८००, बद्रीनाथ धाममध्ये १२००, गंगोत्रीमध्ये ६०० आणि यमुनोत्रीमध्ये ४०० यात्रेकरूंना परवानगी असेल. तसेच यात्रेकरु कोणत्याही तलावात स्नान करू शकणार नाहीत. या व्यतिरिक्त, न्यायालयाने प्रत्येक भक्त किंवा प्रवाशाला कोरोना निगेटीव्ह अहवाल आणि लसींचे दोन्ही डोस घेतल्याचे प्रमाणपत्र सोबत असणे गरजेचे आहे.





