बिजिंग – अर्जेन्टिनाचा जागतिक स्टार फुटबॉलपटू लिओनेल मेस्सी याने आपण 2026 साली होणारा विश्वकरंडक फुटबॉल खेळणे कठीण आहे. त्यावेळी तंदुरुस्ती कशी असेल व कामगिरीत कसे सातत्य असेल त्यावर विचार करणार आहे, असे मेस्सीने सांगितले. मेसी सध्या एका आंतरराष्ट्रीय मैत्रीपूर्ण सामन्यात सहभागी होण्यासाठी चीनमध्ये आला आहे. 2022 सालची विश्वकरंडक स्पर्धा माझ्या कारकिर्दीतील अखेरची स्पर्धा होती. त्यातही माझी तंदुरुस्ती राहिली व कामगिरीतही सातत्य राहिले तर विचार करेन, परंतू सध्या तरी पुढील विश्वकरंडक स्पर्धा खेळणे कठीण वाटत आहे, असे माध्यमांशी बोलताना मेस्सीने सांगितले.